पोलिस शिपायावर गुन्हा दाखल, वरिष्ठांचे संभाषण वायरल करणं पडलं भारी

पोलिस कर्मचारी व अधिका-यांमध्ये व परिणामी सरकारबाबत द्वेषाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने ही रेकॉर्ड अपलोड केल्याची तक्रार वरळी पोलिसात करण्यात आली आहे.

पोलिस शिपायावर गुन्हा दाखल, वरिष्ठांचे संभाषण वायरल करणं पडलं भारी
SHARES

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून सोशल मिडियावर वायरल करणे मुंबई पोलिस दलातील एका शिपायाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठांनी त्या शिपाया विरोधात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी वरळी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- ‘ब्रँड ठाकरे’असला, तरी…

मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेला पोलिस शिपाई सचिन अभिराम जैस्वाल हा पोलिस दलातील कनिष्ठ कर्मचा-यांच्या अडचणींबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ तयार करतात. त्यानंतर तो व्हिडिओ पोलिस कर्मचा-यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप व इतर समाज माध्यमांवर वायरल करत होते. दरम्यान १२ सप्टेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास क्यू आर टीचे पोलिस उपायुक्त वसंत जाधव यांना सचिन यांनी फोन केला होता. त्यावेळी विशेष सुरक्षा विभाग एस पी यू येथे निवड झालेल्या सहा पोलिस कमांडोंना कार्यमुक्त का केले नाही, असे विचारले. त्यावेळी जाधव यांनी त्याला तुम्ही क्यूआरटीमध्ये कामाला आहेत का, अशी विचारणा केली. त्यावेळी जैस्वाल याने आपण ‘ल’ विभाग नायगाव येथे कामाला असल्याचे सांगितले व पोलिस संघटनेच्या वतीने आपण याबाबत विचारणा करत असल्याचे जैस्वाल याने जाधव यांना सांगितले. त्यावेळी जाधव यांनी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार या कमांडोंना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. तुम्हाला याबाबत काही बोलायचे असल्यास कार्यालयात येऊन भेट घ्यावी असे जाधव यांनी सांगितले.

हेही वाचाः- कल्याण डोंबिवलीत ४५८ नवीन रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

कालांतराने जाधव आणि जैस्वाल यांच्यातील फोन रेकॉर्डिंग ही पोलिसांच्या व्हाँट्स अँप ग्रुपवर वायरल झाली. याची माहिती जाधव यांना मिळाली. पोलिस कर्मचारी व अधिका-यांमध्ये व परिणामी सरकारबाबत द्वेषाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने ही रेकॉर्ड अपलोड केल्याची तक्रार वरळी पोलिसांत जाधव यांनी जैस्वाल विरोधात केली. त्यानुसार वरळी पोलिसांनी पोलिस अधिनियम १९२२ च्या कलम३ (अप्रितीची भावना चेतावणे) अंतर्गत जैस्वालविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरळी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय