अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषित, जप्त होऊ शकते संपती

Thane
अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषित, जप्त होऊ शकते संपती
अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषित, जप्त होऊ शकते संपती
अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषित, जप्त होऊ शकते संपती
See all
मुंबई  -  

एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या ममता कुलकर्णीला 2000 कोटींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणी ठाणे पोलिसांनी फरार घोषित केले आहे. ममताच्या यारी रोड येथील घरावर ठाणे पोलिसांनी नोटीस लावली असून 30 दिवसांत कोर्टात हजर होण्याची मुदत ममताला दिली आहे. हजर न राहिल्यास तिच्या संपत्तीवर जप्तीची देखील कारवाई होऊ शकते. या प्रकरणी सध्या परदेशात असलेल्या ममता विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याचे संकेत देखील यावेळी ठाणे पोलिसांनी दिले आहेत. ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्‍वामीवर 'इफेड्रिन' नावाच्या ड्रग्जची तस्करी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ते दोघेही एक वर्षापासून फरार आहेत. सध्या हे दोघेही केनियात लपून बसल्याचा दावा ठाणे पोलिसांनी केला आहे.काय आहे हे प्रकरण ?

विशेष म्हणजे मागच्या वर्षी 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी ड्रग्जची म्हणजेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडले होते. या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोलापूरमधील ड्रग्ज तयार करणाऱ्या एवोन लाईफ साईंसेज प्रा. लि. या कंपनीवर छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी 2000 कोटींचं इफेड्रिन नावाचं ड्रग्ज जप्त केली. या प्रकरणाचं कनेक्शन सोलापूरपासून आता केनियापर्यंत पोहचलं आहे. याच प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विक्की गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणात अद्याप आठ जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. मात्र, मुख्य सूत्रधार असलेल्या ममता आणि तिच्या नवऱ्यापर्यंत अद्याप ठाणे पोलीस पोहचू शकलेले नाहीत.यापूर्वीही झाली होती दोघांना अटक

2014 मध्ये केनियाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी विकी आणि ममताला ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. यापूर्वी 1997 मध्ये विकीला दुबईत ड्रग्ज रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक झाली होती. त्याला 25 वर्षांची शिक्षा देखील झाली. पण 2012 मध्ये चांगल्या वागणुकीमुळे त्याची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर बाहेर आलेल्या विकीने 2013 मध्ये ममताशी लग्न केले. त्यानंतर ते दोघेही केनियातल्या मुंबासामध्ये राहू लागले. त्यानंतर विकीच्या ड्रग्ज रॅकेटच्या या व्यवसायात ममताही सामिल झाल्याचे बोलले जाते. पण ममताने विकीशी लग्न झाल्याचे नाकारत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे सांगितले. काही काळानंतर ते दोघेही विभक्त झाले.हे देखील वाचा -

मी योगिनी आहे - ममता कुलकर्णीडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.