चित्रपट निर्मात्याची पत्नी, मुलीची पेटवून घेऊन आत्महत्या

अस्मिता आणि सृष्टी यांनी अंधेरी येथील डीएन नगरमधील घरी आत्महत्या आहे. या दोघींनी आपल्या अपार्टमेंटमध्ये खोली बंद करून स्वतःला पेटवून घेतलं.

चित्रपट निर्मात्याची पत्नी, मुलीची पेटवून घेऊन आत्महत्या
SHARES

मुंबईत चित्रपट निर्माते संतोष गुप्ता यांच्या पत्नी आणि मुलीने घरात पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अस्मिता गुप्ता आणि सृष्टी गुप्ता अशी मायलेकींची नावे आहेत.

अस्मिता आणि सृष्टी यांनी अंधेरी येथील डीएन नगरमधील घरी आत्महत्या आहे.  या दोघींनी आपल्या अपार्टमेंटमध्ये खोली बंद करून स्वतःला पेटवून घेतलं. खोलीतून धूर झाल्याने शेजाऱ्यांनी अग्निशामन दलाला बोलावलं. अग्निशमन दल आणि डी. एन. नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी अस्मिता आणि सृष्टी यांना आगीच्या ज्वाळांनी वेढल्याचं दिसलं. 

गंभीररित्या भाजलेल्या दोघींना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र अस्मिता यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर सृष्टी ७० टक्के भाजल्याने तिला ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर येथे हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना मंगळवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला.

अस्मिता गुप्ता या ५५ वर्षांच्या होत्या. त्या बऱ्याच दिवसांपासून किडनीच्या दुर्धर आजाराने त्रस्त होत्या.  आजाराला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं आहे. आईची ही अवस्था पाहून मुलगी सृष्टीनेसुद्धा आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

संतोष गुप्ता यांना कमी बजेट चित्रपटांसाठी ओळखलं जातं. त्यांनी २०११ मध्ये ‘फरार या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याचबरोबर संतोष यांनी ‘रोमी द हिरो’ ‘आज की औरत’ या चित्रपटांची सुद्धा निर्मिती केली आहे.हेही वाचा -

मुंबई महापालिकेची नवी गाइडलाइन; आता 'या' गोष्टींनाच परवानगी

आता खासगी ऑफिसातही मिळणार कोरोना लस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा