आर्थिक गुन्हे शाखा पोलिस आयुक्तांच्या रडारवर


आर्थिक गुन्हे शाखा पोलिस आयुक्तांच्या रडारवर
SHARES

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीवर यापूर्वीच मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आता नुकतंच हायप्रोफाइल गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या अकार्यक्षमतेमुळे आयुक्तांनी सायबर पोलिसांकडे वर्ग केला आहे. याच प्रकरणात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्याची बर्वे यांनी बदली देखील केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रसिद्ध शैक्षणीक मोबाइल अॅप्लिकेशनच्या माजी उपाध्यक्षाविरुद्ध दाखल झालेल्या नऊ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास सध्या सायबर पोलिस तपास करत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण ?

मुंबईत नवीन मोबाईल  अॅप्लिकेशन सुरू करण्यासाठी दोन व्यवसायिक आणि अॅप्लिकेशनचा तज्ज्ञांनी एकत्र ऐवून काही कोटींची गुंतवणूक केली होती. मात्र, काही कारणास्तव दोघांमध्ये पुढे खटके उडाले. त्या व्यवहारात  ई-लर्निन अॅप्लिकेशनचा तज्ज्ञ व भारतातील सर्वात मोठ्या ई-लर्निंग अॅप्लिकेशनचा माजी उपाध्यक्ष याने सायबर डाटा चोरी करून स्वतःची कंपनी स्थापन केली. त्याने सहभागी व्यवसायिकाला ९ कोटींना गंडवलं. या व्यावसायिकाने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली होती. चौकशीत कंपनीच्या एचआर महिलेनेही यात मदत केली केली असून तिच्या मदतीने कंपनीतील अॅडमीन डोमेनमधील तक्रारदार व्यावसायिकाचा लॉग इन बंद करण्यात आल्याचं उघडकीस आलं. १ हजार १८० फाईल तेथून ट्रान्सफर करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. 

असमाधानकारक तपास 

 पोलिसांनी  कमी कालावधील गुन्हा नोंदवत दोनवेळा आरोपी उपाध्यक्षाच्या घरावर छापे टाकले. पोलिसांची कारवाई ही असमाधानकारक होती. याशिवाय आरोपी व तक्रारदाराने गुंतवलेली रक्कम व दाखल झालेला ९ कोटी रुपयांचा गुन्हा याचे गणित जुळत नव्हते. त्यामुळे आधीच याबाबत चौकशी सुरू होती. या सर्व गोष्टी पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या निदर्शनास आल्या. त्यांनी स्वतःही या प्रकरणाची सखोल पडताळणी केली. गुन्हा दाखल होण्यापूर्वी झालेल्या प्राथमिक चौकशीबाबत समाधान न वाटल्याने याप्रकरणी पारदर्शक तपास होण्यासाठी हे प्रकरण आयुक्तांनी सायबर पोलिसांकडे वर्ग केले.  तसंच या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याचीही विशेष शाखा १ मध्ये बदली करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली. दरम्यान, याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगत हा मालमत्ता अधिकाराचा वाद असल्याचं म्हटलं. मालमत्ता अधिकार वादाच्या गुन्ह्यांबाबत आर्थिक गुन्हे शाखेत वेगळा कक्ष नसल्याचंही त्यांनी सांगितले.

आयुक्तांची नाराजी

आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीबाबत बर्वे यांनी नाराजी व्यक्त केल्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यातच संशयीत आरोपीला विमानतळावर ताब्यात घेण्यात आल्यानंतरही त्याला सोडून दिल्याच्या आरोपाखाली पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचं निलंबंन करण्यात आलं होते. याप्रकरणी गुन्हे शाखा चौकशी करत आहेत. बर्वे यांनी पूर्वीही या शाखेच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती.



हेही वाचा -

मुंबईत साडेसात कोटींचं रक्तचंदन जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

५३ कोटींचं एमडी ड्रग्ज एटीएसकडून जप्त




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा