म्हणून दाखल झाला अभिनेता नसरूद्दीन शहाच्या मुलीवर गुन्हा

रुग्णालयात गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हिबाला पाच मिनिटं थांबण्यास सांगितल्याने झाला वाद

म्हणून दाखल झाला अभिनेता नसरूद्दीन शहाच्या मुलीवर गुन्हा
SHARES

पशु वैद्यकिय (Veterinarians and animal clinics) रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नसरूद्दीन शहा (Senior actor Nasruddin Shah) यांच्या मुलीवर वर्सोवा पोलिस (varsova police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री हिबा शाह (Actress Hiba Shah) असे नसरूद्दीन शहा यांच्या मुलीचे नाव आहे. हिबा मैत्रिणीच्या दोन मांजरी घेऊन पशुवैद्यकिय रुग्णालयात गेली होती. त्यावेळी तिचे तेथील महिला कर्मचाऱ्यांसोबत भांडण झाले.

हेही वाचाः- पत्नीवर मित्रांच्या मदतीने बलात्कार – तिघांना अटक

अभिनेत्री हिबा शाह हिची मैत्रीण सुप्रिया शर्मा हिने तिच्याकडे असलेल्या दोन मांजरींच्या नसबंदीसाठी पशु रुग्णालयातील डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती. तिला रूग्णालयात जाणं शक्य नसल्यानं तिनं हिबाला दोन्ही मांजरी घेऊन जाण्यास सांगितलं. सुप्रियाच्या दोन्ही मांजरींना घेऊन हिबा रुग्णालयात गेली होती. रुग्णालयात गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हिबाला पाच मिनिटं थांबण्यास सांगितले. सर्जरी सुरू असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी तिला दिली. काही वेळ गेल्यानंतर हिबाला राग अनावर झाला. तिने रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर आरडाओरड करायला सुरूवात केली.

हेही वाचाः-आंगणेवाडी जत्रेसाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष एक्स्प्रेस

मांजरींची सर्जरी करण्यापूर्वी कागदपत्रांवर स्वाक्षरी मागितल्यानंतरही हिबा संतापली. तिने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. परत जाण्यास सांगितल्यानंतर तिने क्लिनिकच्या दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यांनी केला होता. १६ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी रुग्णालयानं पोलिसांत तक्रार दाखल केली. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला होता. त्यावरून वर्सोवा पोलिसांनी हीबाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः-शिवभोजन थाळीला उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्याच दिवशी ११,२७४ थाळींची विक्री

संबंधित विषय