पत्नीवर मित्रांच्या मदतीने बलात्कार, तिघांना अटक

घटस्फोट मिळवण्यासाठी त्याने उचलले टोकाचे पाऊल

पत्नीवर मित्रांच्या मदतीने बलात्कार, तिघांना अटक
SHARES

पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईच्या जोगेश्वरी (jogeshwari) परिसरात घडली आहे. मित्रांच्या मदतीने नराधम पतीने आपल्या पत्नीवर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची धक्कादायकबाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः-लोकलमध्ये या कारणांमुळे लागली मराठी पाटी

वसई (vasai) परिसरात राहाणाऱी पीडित महिलेचे काही महिन्यांपूर्वीच आरोपी पतीसोबत लग्न झाले होते. मात्र क्षुल्लक कारमांवरून दोघांमध्ये कायम खटके उडायचे. यातून दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच दोन महिन्यापूर्वी हे दोघेही वसई येथून जोगेश्वरी येथे राहण्यासाठी आले होते. काही दिवसांपूर्वी आरोपीने त्याच्या मित्रासह आपल्या पत्नीवर अमानुष बलात्कार केला. ऐवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून पीडिताकडे घटस्फोटाची (Divorce) मागणी करू लागला. याशिवाय हा प्रकार कोणालाही सांगितला तर जिवे मारण्याची धमकी आरोपींनी तिला दिली.

हेही वाचाः-शिवभोजन थाळीला उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्याच दिवशी ११,२७४ थाळींची विक्री

 जीवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी आपल्या मित्रासह तिच्यावर मानसिक व शाररिक शोषत करत होता. याच कारणांवरून पीडिताने अखेर वसई येथील स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी तिघांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत तिन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या तिन्ही आरोपींना वांद्रे येथील स्थानिक न्यायालयालया(Bandra Court)ने पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचाः- नाव लावल्याने कोणी ‘हिंदूहृदयसम्राट’ होत नाही, शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा