मंगलदास मार्केटच्या गोडाऊनमध्ये आग


  • मंगलदास मार्केटच्या गोडाऊनमध्ये आग
  • मंगलदास मार्केटच्या गोडाऊनमध्ये आग
SHARE

मस्जिद बंदर - मंगलदास मार्केटमधील रमनलाल विठ्ठलदास संस गोडाऊनमध्ये शुक्रवारी लागलेली आग आटोक्यात आली आहे. शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. आगीत मोठ्या प्रमाणात गोदाममधला माल जळाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. गोदामाच्या बाजुलाच गारमेंटची दुकाने आहेत. या दुकानांना देखिल आग लागण्याची शक्यता होती. त्यानुसार या झोन अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांना सील करण्यात आले होते. या गोदामात ड्रायफ्रुट बनवण्याचं काम होत असल्याचं काही स्थानिकांनी सांगितलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

मंगलदास मार्केटच्या गोडाऊनमध्ये आग
00:00
00:00