आगीवर नियंत्रण

 Malad
आगीवर नियंत्रण

मालाड - गोकुळधाम परिसरातल्या पिंपरीपाडात रुची हाईट्स या इमारतीच्या 23 व्या मजल्यावर बुधवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील सर्व फर्निचर जळून खाक झाले. अवघ्या काही तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

रुची हाईटसमधील 23 मजल्यावरील आग लागलेले हे घर हिंदी टीव्ही मालिकेतील अभिनेता अमित बेहल यांचे आहे. आग लागली त्यावेळी घरात त्यांचे आई-वडील होते. शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचे बेहल कुटुंबियांनी सांगितले.

Loading Comments