मुंबईतील ५ विद्यार्थिनी शुक्रवारपासून बेपत्ता


मुंबईतील ५ विद्यार्थिनी शुक्रवारपासून बेपत्ता
SHARES

कुलाब्यातील फोर्ट कॉन्व्हेट स्कूलमध्ये आठवीत शिकणाऱ्या ५ विद्यार्थिनी शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने या परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेमुळे सध्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण दिसत असून या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुलाबा पोलिसांनी या विद्यार्थिनीचा शोध सुरू केला आहे.


काय झालं शुक्रवारी?

शुक्रवारी शाळेत 'ओपन डे' (विद्यार्थ्यांच्या प्रगतीसंदर्भात पालकांसोबत चर्चा करण्याचा दिवस) होता. त्यानुसार या पाचही जणी शाळेत आल्या होत्या. 'ओपन डे'मध्ये त्यांच्या परीक्षेतील मार्कांवर चर्चा करण्यात आली. यामुळे त्या तणावाखाली होत्या.


सीसीटीव्ही फुटेल मिळाले, पण...

कारण काही दिवसांपूर्वी शाळेत झालेल्या चाचणी परीक्षेमध्ये या सर्व विद्यार्थिनींना कमी गुण मिळाले होते. याच तणावामुळे या विद्यार्थिनी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी न जाता मरीन डाइव्हवर बसून होत्या. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत. परंतु त्यानंतर मात्र त्यांना कुणीही पाहिलं नाही.

सध्या या पाचही जणींची छायाचित्रं सर्व पोलिस ठाण्यात पाठवण्यात आली असून शहरात मरीन ड्राइव्ह परिसराचा कानाकोपरा पोलिसांकडून तपासला जात आहे.


शाळा प्रशासनाकडून सहकार्य

शुक्रवारी आठवीतील विद्यार्थ्यांचे पालक निकाल घेण्यासाठी शाळेत आले होते. त्यावेळी या मुलीही शाळेत उपस्थित होत्या. त्यावेळी या मुलींना कमी गुण मिळाले म्हणून कुणीही ओरडलं वा हिणवलं नाही. विशेष म्हणजे हे पेपर फक्त पालकांनी पाहिले. शाळा प्रशासनाला नुकतीच ही घटना समजली आहे. या प्रकरणाची पोलिस चौकशी करत असून शाळा प्रशासन पोलिसांना पूर्ण सहकार्य करेल, अशी माहिती शाळा प्रशासनानं दिली आहे.



हेही वाचा-

एनआयएऐवजी पुणे पोलिसांकडून कारवाई कशी? न्यायालयात याचिका

'स्टॅटर्जी आॅफ टॅक्टीस इन इंडिया' नुसार नक्षलवाद्यांनी अाखली व्यूहरचना



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा