चिमुकलीवर लैगिक अत्याचार करून केली हत्या

माहीम इथं पदपथावर झोपलेल्या पाच वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

SHARE

माहीम परिसरात पदपथावर झोपलेल्या 5 वर्षीय  मुलीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी उघडकीस आला. या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नराधमांनी मुलीचा मृतदेह न्यू राजेंद्र अपार्टमेंटजवळील निर्मनुष्य परिसरात टाकून पळ काढला आहे. याप्रकरणी माहीम पोलिस अधिक तपास करत आहेत.  


मुलीवर अत्याचार करून केली हत्या 

माहीम परिसरातील एल. जे. रोडवर बुधवारी मध्यरात्री अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. मजूरी करून पोट भरणाऱ्या रस्त्यावरील कुटुंबातील ५ वर्षीय चिमुकली बुधवारी रात्री तिच्या कुटुंबियांसोबत पदपथावर झोपली होती. रस्त्यावर आई- वडिलांसोबत झोपलेल्या पाच वर्षीय मुलीला नराधमानं झोपेतच पळवून नेलं. त्यानंतर दर्ग्याच्या गल्लीतील लिवंग रुम या शोरूमच्या मागे एका क्रॉस जवळील निर्जनस्थळी त्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची गळा आवळून हत्या केली.


माहीम पोलिस आरोपीच्या मागावर 

गुरूवारी पहाटे पाचच्या सुमारास वडिलांना शेजारी मुलगी नसल्याचं लक्षात आलं.  त्यांनं पत्नी आणि नातेवाईकांसोबत मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. तातडीनं मुलीच्या आई-वडिलांनी माहीम पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली.  पोलिसांनी देखील पालकांसोबत या मुलीचा शोध सुरू केला. त्यावेळी  सकाळी सातच्या सुमारास रझाक मंजिलपासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या न्यू राजेंद्र अपार्टमेंटजवळील निर्मनुष्य परिसरात अर्धनग्न स्थितीमध्ये या मुलीचा मृतदेह सापडला. याप्रकरणी माहीम पोलिस ठाण्यात हत्येसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिस अधिक तपास करत आहेत. हेही वाचा

पॉप गायक रॉडनी फर्नांडिसची फसवणूक करणारा अटकेत

आरोपींना तुरूंगाबाहेर काढणाऱ्या टोळीचा तपास 'एसआयटी'कडेसंबंधित विषय
ताज्या बातम्या