पॉप गायक रॉडनी फर्नांडिसची फसवणूक करणारा अटकेत

प्रसिद्ध पॉप गायक रॉडनी फर्नांडिस आणि त्याच्या बँडच्या ९ सदस्यांची फसवणूक करणाऱ्याला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

पॉप गायक रॉडनी फर्नांडिसची फसवणूक करणारा अटकेत
SHARES

प्रसिद्ध पॉप गायक रॉडनी फर्नांडिस आणि त्याच्या बँडच्या ९ सदस्यांची सुमारे १८ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्याला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. मयुर अग्रवाल असं या आरोपीचं नाव आहे. फर्नांडिस यांनी 'फॅनी' चित्रपटांसाठी तसंच 'स्वच्छ भारत अभियान'साठी पार्श्वगायन केलं आहे. रॉडनीला गुंतवणूकीवर १८ ते २२ टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यांतील ही पहिली अटक आहे.

नेमके काय आहे प्रकरण 


रॉडनीचा 'राँडनी एन्टरटेन्मेटनावाचा प्रसिद्ध बँड आहे२०१५ मध्ये रॉडनीची ओळख मयुर अग्रवाल याच्यासोबत झाली. त्यानं त्याचे गुजरातमधील मामा संजय अग्रवाल यांच्यामार्फत जमिनीमध्ये पैसे गुंतवून १८ ते २२ टक्के परतावा देण्याचे आमीष रॉडनीला दाखवलं. त्यानुसार ऑक्टोबर २०१५ पासून रॉडनीनं त्याच्याकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तसंच रॉडनीनं यापूर्वी खरेदी केलेलं सोन्याचीही अग्रवालांकडे गुंतवणूक केली. असे एकूण १५ कोटी साठ लाख रुपये २०१८ पर्यंत अगरवालकडे जमा करण्यात आलेसुरुवातीला २०१६ पर्यंत रॉडनीला अग्रवालनं नियमित व्याजाचे पैसे दिले. त्यामुळे त्याच्या बॅण्डमधील इतर ९ सदस्यांनीही अग्रवालांकडे सुमारे दोन कोटी पंधरा लाख रुपये गुंतवले.


गुंतवलेल्या पैशांचा अपहार 

२०१७ ला मयुर अग्रवाल व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागल्यानंतर रॉडनी यानं त्याचा पाठपुरावा केला. त्यावेळी त्यानं मामाकडे दिलेली रक्कम गोरेगावमधील एका कंपनीत गुंतवल्याचं सांगितलं. त्यावेळी रॉडनीनं गोरेगाव इथ्या संजय अग्रवालची भेट घेतली. सुरतमध्ये जमिनीमध्ये सुमारे आठ कोटी रुपये गुंतवण्यात आल्याचं संजयनं सांगितलं. तसंच सहा कोटी रुपये मयुरनं पुण्यातील मित्र नितीन लोहादीया यांच्याकडे गुंतवल्याचं सांगितलं. रॉडनी यानं वांद्रे इथं लोहारिया यांची भेट घेतली. त्यावेळी मयुरनं दिलेले पैसे हे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचं लोहारियानं रॉडनीला सांगितले.

फसवणूकी प्रकरणी गुन्हा दाखल

२०१७ नंतर व्याजाची रक्कम मिळण्यास बंद झाल्यामुळे रॉडनी आणि त्याच्या सहकलाकारांनी १७.७७ कोटींची फसवणूक  झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली. त्यानुसार याप्रकरणी संजय अग्रवाल, मयुर अग्रवाल बंगेरा आणि लोहादीया यांच्याविरुद्ध  २५ फेब्रुवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी नुकतीच मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मयुर अग्रवाल याला अटक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.



हेही वाचा

आरोपींना तुरूंगाबाहेर काढणाऱ्या टोळीचा तपास 'एसआयटी'कडे

‘कौमार्य चाचणी’ केल्यास नोंदवला जाणार गुन्हा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा