‘त्या’ आरोपीसाठी तब्बल १ महिना पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य केले

सत्र न्यायालय येथे न्यायालयीन कार्यवाही करण्याकरता गेल्यावर्षी फेब्रवारी महिन्यात नेले असताना आरोपीने तेथून नजर चुकवून पलायन केले होते.

‘त्या’ आरोपीसाठी तब्बल १ महिना पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य केले
SHARES

पश्चिम बंगालचा रहिवाशी असलेला आरोपी फेब्रुवारी महिन्यात न्यायालयिन कामकाजावेळी पोलिसांना चकवा देऊन पळून गेला होता. पोलिस त्याला शोधत गावी गेले असता. त्याची पूर्व कल्पना त्याला मिळायची आणि पोलिसांना चकवा देण्यात तो यशस्वी व्हायचा. दोन ते तीन वेळा असा प्रकार घडल्यानंतर पोलिसांमधील दोन शिपाई वेशांतर करून गावात वावरत होते. आरोपी बांगलादेशला पळून जाण्यात तयारीत असताना पैसे घेण्यासाठी नातेवाईकांकडे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पकडले. 

हेही वाचाः- आजपासून हिवाळी अधिवेशन गाजणार, 'या' अध्यादेशांवर होणार चर्चा

मूळचा पश्चिम बंगालच्या पांडुआ येथील बैची पूर्वा पाडा येथील आरोपी  मोहम्मद बादशहा मोहम्मद सलीम शेख (२४)  हा रहिवाशी आहे. २०१९ मध्ये एका गुन्ह्यात त्याला कुलाबा पोलिसांनी सत्र न्यायालय येथे न्यायालयीन कार्यवाही करण्याकरता नेले होते. त्यावेळी आरोपीने तेथून नजर चुकवून पलायन केले . याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात  कलम २२४ भा द वि अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तपासणी केली असता आरोपी पश्चिम बंगाल येथील पांडुआ येथील बैची पूर्वा पाडा येथील मूळचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला असता आरोपी गेल्या वर्षभरापासून गावी परतला नव्हता. अखेर ८ डिसेंबरला तो गावी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस नाईक निकम, पोशी व भोसले यांचे पथक आरोपीच्या मूळ गावी पश्चिम बंगाल येथे रवाना झाले.

हेही वाचाः- प्रताप सरनाईक हाजीर हो...! ईडीकडून पुन्हा बोलावणं

मात्र पोलिस गावात आल्याची बातमी शेखला मिळताच तो पून्हा गावातून पळून जायचा, सलग दोन ते तीन वेळा पोलिसांसोबत हा प्रकार घडल्यानंतर आरोपीला मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीला पकडण्यासाठी  सहकार्य न केल्यास कायदेशीर कारवाई भिती दाखवल्यानंतर त्याने पोलिसांना सहकार्य केले. त्याच्याच घरात पोलिस वेशांतर करून तब्बल १ महिना शेख गावात येण्याची वाट बघ होते. पोलिस कारवाईला घाबरून शेख हा बांग्लादेश बॉर्डर येथील नातेवाईकाच्या गावी पळून जाण्यासाठी काही पैसे घेण्यासाठी  त्याचे मूळ गावी त्याचे घरी आला. त्याबाबची माहिती मिळताच पोलिसांनी घराजवळ सापळा रचून त्याला अटक केली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा