बलात्कारप्रकरणी तरुण तेजपालवर आरोप निश्चित


बलात्कारप्रकरणी तरुण तेजपालवर आरोप निश्चित
SHARES

सहकारी महिलेवर बलात्काराचा आरोप असलेले 'तेहलका' मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावर अखेर आरोपांची निश्चिती करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात आपण दोषी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या तरुण तेजपाल जामिनावर बाहेर आहेत.


या कलमांतर्गत गुन्हा

तेजपाल यांच्यावर ३७६ (२) बलात्कार, ३४२, ३४२, ३५४ (अ) अँड (बी) (विनयभंग) या कलमांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत. २१ नाेव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.


घटना काय?

नाेव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यातील बांबोळी परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलात महिला सहकाऱ्याचा लैंगिक शोषण केल्याचा आरोप 'तेहलका' या मासिकाचे तत्कालीन संपादक तरुण तेजपाल यांच्यावर लावण्यात आला होता. ३० नोव्हेंबरला तेजपाल यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना मासिकाचे संपादकपद सोडावे लागले होते.

या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाल्यावर तरुण तेजपाल यांना अटक झाली. १७ फेब्रुवारी २०१४ रोजी पोलिसांनी तेजपाल विरोधात ६८४ पानी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर स्वतःवर लावण्यात आलेले आरोप हटवण्यासाठी तेजपाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

मात्र उच्च न्यायालयाने त्याचे अपील फेटाळून लावल्यावर २८ सप्टेंबरला त्यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. २१ नाेव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.



हेही वाचा -

अर्जुन रामपालच्या भाऊजीला क्रिकेट बेटींग प्रकरणी अटक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा