कुलाब्यातून ४ अफगाणींना अटक

मुंबई (mumbai) तील कुलाबा (Colaba) मधून डी. बी. मार्ग पोलिसांनी ४ अफगाणी घुसखोरांना (Afghan intruder) अटक (arrest) केली आहे.

कुलाब्यातून ४ अफगाणींना अटक
SHARES

मुंबई (mumbai) तील कुलाबा (Colaba) मधून डी. बी. मार्ग पोलिसांनी ४ अफगाणी घुसखोरांना (Afghan intruder) अटक (arrest) केली आहे. हे चारही अफगाणी अट्टल चोर असल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे ५० मोबाइल (mobile), १० लॅपटाॅप (laptop) जप्त केले आहेत. 

कुलाबा(Colaba) मधील बिस्टोरीया हॉटेलमध्ये पोलिसांनी (police) धाड टाकून या अफगाणींना अटक केली. त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मुंबईत हे चारही अफगाणी वेगवेगळ्या हाॅटेलमध्ये राहत होते. हे सर्वजण चोरी करत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोरांच्या विरोधात ९ तारखेला  मोर्चा काढला. त्यानंतर पोलिसांकडून घुसखोरांविरोधात कारवाई करण्यात आल्या. पालघर, ठाणे, नवी मुंबईतील घुसखोरांवर नुकतीच कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता मुंबईत शहरातही कारवाई करण्यात आली. 


विरार पश्चिमेकडील अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याअंतर्गत दहशदवाद विरोधी पथक आणि मानवी तस्करी विरोधी शाखेनं गुरूवारी कारवाई करत २३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं. मानवी तस्करी विरोधी विभागाच्या पालघर शाखेचे महेश गोसावी यांना अर्नाळा विभागात बांगलादेशी असल्याची खबर मिळाली होतीपोलीस निरीक्षक भास्कर पुकळेदहशदवाद विरोधी पथकाचे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या मदतीनं बांगलादेशींना ताब्यात घेतलं. यामध्ये १० महिला, १२ पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. सर्व बांगलादेशी भंगारचा व्यवसाय आणि मोलमजुरी करण्यासाठी आले होतेअसं पोलीस तपासात उघड झालं आहे.


हेही वाचा -

गौतम नवलखा, तेलतुंबडे यांचा हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

मोकाट कुत्र्याला सांभाळणं महिलेच्या बेतलं जीवावर; महिलांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा