कांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणी ४ अटकेत, धक्कादायक माहिती उघड

कांदिवलीतील हिरानंदानी इस्टेट सोसायटीत ३० मे रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ३९० नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली.

कांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणी ४ अटकेत, धक्कादायक माहिती उघड
SHARES

मुंबई (mumbai) तील कांदिवली (kandiwali) मधील हिरानंदानी सोसायटीमध्ये नागरिकांना कोरोनावरील बनावट लस (fraud covid vaccination) दिल्याप्रकरणी ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर आणखी तीन ते चार जण फरार आहेत. या आरोपींनी मुंबईत नऊ ठिकाणी अशाच प्रकारे लसीकरण शिबीरं आयोजित करून बनावट लस दिल्याचं समोर आलं आहे. 

आरोपींमध्ये एका मोठ्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. धक्कादायक म्हणजे या फसवणुकीचा मास्टरमाइंड १० वी नापास व्यक्ती आहे. तो १७ वर्षांपासून मेडिकल फील्डमध्ये काम करत होता. लसीची व्यवस्था करणं आणि शिबीराची  जबाबदारी सांभाळण्याचं काम त्याच्यावर होतं. तर आरोपीमध्ये एक जण मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. त्याने तेथील सतना येथून लसींचा पुरवठा केला होता.

कांदिवलीतील हिरानंदानी इस्टेट सोसायटीत ३० मे रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ३९० नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. या शिबिराची सुविधा राजेश पांडे या व्यक्तीने उपलब्ध केली होती. आपण कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचं त्याने सोसायटीतील नागरिकांनी सांगितलं होते. राजेश पांडे याने सोसायटी समितीच्या सदस्यांशी संपर्क केला होता. तर संजय गुप्ता याने शिबीर घेतलं आणि महेंद्र सिंग यांने सोसायटीतील सोसायटी सदस्यांकडून रोख पैसे घेतले, अशी माहिती नागरिकांनी दिली आहे.

मात्र, लस घेतल्यानंतर कुणालाही मेसेज आला नाही. तसंच लस घेतल्यानंतर कोणतीही लक्षणं दिसली नाही किंवा दुष्परिणामही दिसून आले नाहीत, असं नागरिकांनी सांगितलं. ज्या रुग्णालयांच्या नावाने प्रमाणपत्र दिले गेले, त्या रुग्णालयांनी आपण लसीकरण शिबीर घेतलं नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे आपल्याला बोगस लस दिली गेल्याचं या नागरिकांनी समजलं. सोसायटीतील नागरिकांनी प्रति डोस १२६० रुपये दिले होते. 

या सोसायटीतील लसीकरणासाठी महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचं तपासातून उघड झालं आहे. तसंच लसीकरण शिबीराच्या वेळी कुणीही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते, असंही समोर आलं आहे. शिबीरात वापरण्यात आलेली लस कोणत्याही अधिकृत पुरवठादाराकडून घेतलेली नसल्याचंही उघडकीस आलं आहे. हेही वाचा - 

पुढच्या २ ते ४ आठवड्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येणार?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती

मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे; मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा