नायजेरियन ड्रग्ज तस्करांना आरेतून अटक

आरेच्या चेकपोस्ट नाक्याजवळील झुडपात हे नायझेरियन ग्राहकाची वाट पाहत असतात. त्यानुसार लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटने सापळा रचला होता. गोरेगाव पूर्वेकडील आरे चेकनाका परिसरात चार नायजेरियन तरुण संशयास्पद दिसले.

SHARE

मुंबईच्या भायखळा परिसरात नायझेरियन तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर या नायझेरियन तस्करांनी आरेच्या जंगलात नव्याने अड्डा सुरू केला आहे. याची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी रविवारी रात्री कारवाई करत चार नायझेरियन तस्करांना अटक केली आहे. या चौघांकडून पोलिसांनी अडीच लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत केले आहे.


४० ग्रॅम कोकेन हस्तगत

आरेच्या चेकपोस्ट नाक्याजवळील झुडपात हे नायझेरियन ग्राहकाची वाट पाहत असतात. त्यानुसार लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटने सापळा रचला होतागोरेगाव पूर्वेकडील आरे चेकनाका परिसरात चार नायजेरियन तरुण संशयास्पद  दिसले. मात्र, पोलिसांनी सापळा रचला असल्याचे लक्षात आल्यानंतर ते चौघेही टॅक्सीत बसून निघून जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी चौघांची टॅक्सी अडवत त्यांना अटक केली. पौल अनयायू ओशिनाकाची, ओकिचिकू ओबोना माटिनसी, गोडसवील डिके चिटाची, रुबेन अजा गोडविन अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांकडे पोलिसांना ४० ग्रॅम कोकेन सापडले असून बाजारात त्याची किंमत अडीच लाख रुपये असल्याची माहिती लांडे यांनी दिली आहे.हेही वाचा -

मुंबईतून सौदी अरेबियाला २६ मुलींची तस्करी, वृद्धाला अटक

मोलकरणीवर बलात्कारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या