मुंबईतून सौदी अरेबियाला २६ मुलींची तस्करी, वृद्धाला अटक

सौदीत तरुणीला ज्या कामाचे स्वरुप सांगून नेण्यात आले होते ते काम न देता तिला गैरकृत्य करण्यास भाग पाडले. याबाबतची माहिती तरुणीने तिच्या आईला दिली.

मुंबईतून सौदी अरेबियाला २६ मुलींची तस्करी, वृद्धाला अटक
SHARES

परवाना रद्द झालेल्या कंपनीच्या बनावट कागदपत्रांच्या मदतीने सौदी अरेबियाला २६ मुलींची तस्करी करणाऱ्या एका वृद्धाला भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. नजमुल हसन नाजमी (६७) असं या वृद्ध आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी भायखळा पोलिस अधिक तपास करत आहेत.


गैरकृत्यास भाग पाडलं

वांद्रेच्या भारतनगर परिसरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेने एप्रिल २०१५ मध्ये माझगावच्या “ट्रायोटेक कन्स्लटंट” कंपनीद्वारे कामासाठी टूरिस्ट व्हिजावर सौदी अरेबियाला पाठवले होते. मात्र सौदीत तरुणीला ज्या कामाचे स्वरुप सांगून नेण्यात आले होते ते काम न देता तिला गैरकृत्य करण्यास भाग पाडले. याबाबतची माहिती तरुणीने तिच्या आईला दिली.  तिच्या आईने याबाबत दिल्लीच्या इमिग्रेशन संरक्षण विभागात तक्रार नोंदवल्यानंतर ६ मे २०१६ रोजी नाजमीने तरुणीला भारतात आणले.

या घटनेनंतर नाजमीने “ट्रायोटेक कन्स्लटंट” या कंपनीद्वारे पाठवण्यात आलेल्या प्रवाशांची माहिती इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी गोळा करण्यास सुरूवात केली. या कंपनीच्या परवानाधारक मालकाचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला असून कंपनीचा परवाना तात्पुरता निलंबीत केल्याचं तपासात उघडकीस आलं.


सापळा रचून अटक

तपासात नाजमीने “ट्रायोटेक कन्स्लटंट”द्वारे आतापर्यंत २६ तरुणींना बेकायदेशीर मार्गाने सौदी अरेबियाला पाठवल्याचं निष्पन्न झालं. या “ट्रायोटेक कन्स्लटंट” कंपनीचे कार्यालय माझगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी नाजमीचा शोध सुरू केला. नाजमी हा कुर्ला परिसरात रहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी तो रहात असलेल्या हाॅल रोड परिसरातील इमरान अपार्टमेंटमधील घरी गेले. मात्र नाजमीने घर भाड्याने दिलं होतं. तसंच त्याने भाडेकरूला त्याचा सध्याचा रहात असलेला पत्ताही दिला नव्हता. खबऱ्यांच्या मदतीने नाजमी हा सध्या कुर्लाच्या एलबीएस रोडवर नूर मंजिलमध्ये राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली.



हेही वाचा -

मोलकरणीवर बलात्कारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला अटक

हत्या करून आत्महत्येचा बनाव, एकाला अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा