विजय माल्याच्या नावाने ८ जणांना ४५ लाखांना गंडवलं

सुरेंद्रनाथ सिंह अाणि अारोपीची ओळख मॉर्निंग वॉकला गेल्यावर झाली. त्याने सिंह यांच्याशी मैत्री केली. अापण दिल्लीला राहत असल्याचं त्याने त्यांना सांगितलं. त्याने सुरेंद्रनाथ यांना विजय माल्या यांची एसयूव्ही कार स्वस्तात देण्याचं अामिष दाखवून एसयूव्ही कारचे अनेक फोटो दाखवले.

विजय माल्याच्या नावाने ८ जणांना ४५ लाखांना गंडवलं
SHARES

फरार उद्योगपती विजय माल्या यांच्या नावाने ८ लोकांची एका भामट्याने ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस अालं अाहे. विजय माल्या प्रकरणातील तपास अधिकारी असल्याचं सांगून या भामट्याने फसवणूक केली असून सीबीडी अाणि खारघर पोलिस त्याचा शोध घेत अाहेत. 


एसयूव्ही कारचा लिलाव 

विजय माल्या यांच्या एसयूव्ही कारचा लिलाव होत असल्याचं या अारोपीनं सांगितलं होतं. याप्रकरणी सहाय्यक पोलिस अायुक्त चंद्रहर गोडसे यांनी सांगितलं की, अारोपीने लोकांना सांगितलं की तो अंमलबजावणी संचालनालयाचा अधिकारी अाहे. त्याने कुणाला अापलं नाव अार.के. सिन्हा तर कुणाला राजीव कुमार सिंह सांगितलं. त्याने याअाधी ७ लोकांची फसवणूक केली होती. त्यानंतर त्याने सीबीडी बेलापूर येथे राहणाऱ्या सुरेंद्रनाथ सिंह यांना अापल्या जाळ्यात ओढले. 


मॉर्निंग वॉकला ओळख 

 सुरेंद्रनाथ सिंह अाणि अारोपीची ओळख मॉर्निंग वॉकला गेल्यावर झाली. त्याने सिंह यांच्याशी मैत्री केली. अापण दिल्लीला राहत असल्याचं त्याने त्यांना सांगितलं. त्याने सुरेंद्रनाथ यांना विजय माल्या यांची एसयूव्ही कार स्वस्तात देण्याचं अामिष दाखवून एसयूव्ही कारचे अनेक फोटो दाखवले. यामधील सुरेंद्रनाथ यांनी पजेरो कार निवडली. या कारसाठी तीन दिवसात अारोपीने त्यांच्याकडून ४.२५ लाख रुपये घेतले.  हे पैसे सुरेंद्रनाथ यांनी अारोपीच्या खात्यात ट्रान्सफर केले. 


कुटुंबियांची चौकशी

पैसे घेतल्यावर अारोपी फरार झाला. पोलिस त्याच्या येथील घरीही गेले. घरी त्याची पत्नी, दोन मुली अाणि सासू होती. त्याच्या घरात अनेक कुत्रेही होते. मात्र, त्याच्या कुटुंबियांनी त्याच्याबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. अारोपी अापल्या बिहारमधील जनपत या गावी गेल्याचा पोलिसांचा संशय अाहे. 



हेही वाचा - 

बघा, 'हे' आहेत रेल्वेतील सराईत मोबाइल चोर!

लाच घेणारा म्हाडाचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा