दोन राष्ट्रीयकृत बँकांना ७१ कोटींना गंडा, गुजरातच्या संचालकांवर गुन्हा

तक्रारीनुसार आरोपींनी आपापसात संगनमत करून २००९ ते २०१५ या कालावधीत दोन राष्ट्रीयकृत बँकांची फसवणूक केली.

दोन राष्ट्रीयकृत बँकांना ७१ कोटींना गंडा, गुजरातच्या संचालकांवर गुन्हा
SHARES

दोन राष्ट्रीयकृत बँकांमधून घेतलेले कर्ज बुडवून बँकांचे ७१ कोटींचे नुकसान केल्याप्रकरणी गुजरातमधील दोन कंपन्यांच्या संचलाकांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. व्यवसाय वाढवण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या कर्जाची रक्कमचा दुस-या ठिकाणी वापर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचाः-मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

सयोना कलर्स प्रा. लि. व शेमरॉक केमी प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक परेश पटेल व संचालक व अनोळखी सरकारी कर्मचारी यांच्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे उपमहाव्यवस्थापक जितेंद्र शंकर यांच्या तक्रारीवरून सीबीआयच्या बँकिंग सिक्युरिटीज फ्रॉड ब्रान्चने हा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार आरोपींनी आपापसात संगनमत करून  २००९ ते २०१५ या कालावधीत दोन राष्ट्रीयकृत बँकांची फसवणूक केली. त्यासाठी अनोळखी सरकारी कर्मचा-याचीही मदत झाली असून त्याच्या मार्फत अकाउंट बुक व निधी इतर ठिकाणी फिरवण्यात आला आहे.

हेही वाचाः- महापालिकेची विशेष पथकं ठेवणार नाईट क्लबवर नजर

आरोपी कंपन्यांना बँकांमार्फत विविध क्रेडिट सुविधा देण्यात आल्या होत्या त्यानंतर २७ ऑक्टोबर २०१४ मध्ये ते खाते बुडीत निघाले. त्यावेळी करण्यात आलेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये त्यावेळी २०१३ मध्येच सयोना कलर्स प्रा. लि.कंपनीने उत्पादन बंद केले होते. पण बँकेची कोणतीही परवानगी न घेता तिचे प्लान्ट व मशीन सहाय्यक कंपनी शेमरॉक केमी प्रा. लि. कंपनीच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप आहे. या मालमत्तेची किंमत ९ कोटी रुपये आहे. याशिवाय २३ कोटी रुपये बँकेकडून घेण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणात बँकेला ७१ कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा