लता दिदींच्या नावाने पैसे उकळणारी 'ती' महिला कोण? वाचा...


लता दिदींच्या नावाने पैसे उकळणारी 'ती' महिला कोण? वाचा...
SHARES

ठकसेन सामान्य लोकांना गंडावतातच, पण ते सेलिब्रेटीनांही सोडत नाही. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची खोटी सही घेऊन, लाखो रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी रेवती खरे या ठकसेन महिलेविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नालासोपारा येथे राहणारी रेवती खरे या महिलेने लता मंगेशकरांच्या नावाने बनावट निमंत्रणपत्रिका आणि लेटरहेड तयार केले. अनेक कार्यक्रमांमध्ये रेवती या बनावट पत्रिका वाटून लोकांकडून आर्थिक मदत घ्यायची.

लता दीदींचे नाव पाहून आपणही आर्थिक मदत केल्याची माहिती लता मंगेशकर यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांची भेट घेतली तेव्हा दिली. त्यावर लता दीदींनी आपण तर अशा प्रकारे कोणाला मदत मागितली नाही. कोणीतरी आपल्या नावावर असे करत असावे म्हणून त्यांनी मुंबईतल्या गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी त्या रेवतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता या महिलेचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.


हेही वाचा - 

'हनी ट्रॅप' लाऊन फसवणूक करणारं नायजेरियन जोडपं जेरबंद


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा