लोकलमध्ये प्रवाशांना मारहाण करणाऱ्या महिला टोळीला अटक


लोकलमध्ये प्रवाशांना मारहाण करणाऱ्या महिला टोळीला अटक
SHARES

मुंबंईच्या जीवनवाहिनीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवाशांना अनेकदा बसण्यासाठी सीटच मिळत नाही. काही प्रवासी गर्दीच्या वेळी आपल्या मित्र-मैत्रिणिला बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून चक्क सीट अडवून ठेवतात. जर रोजचा प्रवास करणाऱ्यांव्यतिरिक्त एखादा नवीन प्रवासी दिसला तर त्याला त्या डब्यात चढूही देत नाहीत. हे प्रकार महिलांच्या डब्यात वाढत चालले आहेत.

असाच एक प्रकार लोकलमध्ये घडत असतानाच एका ग्रुपमधील १५ ते २० महिलांना जीआरपीने कल्याण स्टेशनवर सापळा रचून ताब्यात घेतले आहे. डोंबिवलीमध्ये लोकलच्या महिला डब्यात एक महिला चढत होती. त्याचवेळी या ग्रुपमधील महिलांनी तिला बेदम मारहाण केली होती. या संदर्भात तिने तक्रार केल्यानंतर महिला पोलीस थेट त्या डब्यातच शिरल्या आणि महिला प्रवाशांना त्रास देणाऱ्या त्या ग्रुपला पकडले.


">


गुंडागिरी करणाऱ्या महिला प्रवासीला अटक

कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये डोंबिवलीमधून बसून डाऊन-अप जाण्यासाठी (डोंबिली-कल्याण-मुबंई असा प्रवास करण्यासाठी) आधीच जागा अडवल्या जातात. लोकलमधून रोज प्रवास करणाऱ्या महिलांची दहशत वाढत आहे. बुधवारी लोकलमध्ये जागा अडवल्याचा राग आल्याने कल्याण स्थानकातील महिलांनी एका महिलेला मारहाण केल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे. 

डोंबिवलीच्या चारुशीला वेल्हाळ या महिला रेल्वे प्रवाशाला कल्याणच्या महिलांनी मारहाण करत जागा सोडण्यासाठी धक्काबुकी तर केली. त्याचबरोबर तिला बेदम मारहाणही केली. त्याची तक्रार रेल्वे पोलिसांत करण्यात आली होती. डोंबिवली स्थानकातून सकाळी 8.21 ला कल्याणासाठी ही लोकल डाऊनच्या दिशेने धावते. कल्याण स्थानकावरून हीच लोकल सकाळी 8.36ला सीएसटीसाठी निघते. पण बुधवारी ही लोकल 10 मिनिटे उशिराने पोहोचल्याने गोंधळ झाला. लोकल खचाखच भरून आल्याने कल्याणच्या महिला संतापल्या आणि त्यांनी डोंबिवलीवरून बसून आलेल्या महिलांना धक्काबुक्की आणि मारहाण सुरू केली असता कल्याण जीआरपी पोलिसांनी त्यांना पकडले.

कल्याण आणि बदलापूर रेल्वे स्थानकात अशा घटना सातत्याने होत असल्याने या महिलांना अशा प्रकारे शिक्षा देणे गरजेचे आहे. आरपीएफ आणि जीरापी यांनी मिळणू रोज प्रत्येक डब्यात महिला पोलिसांना बसवण्यात यावे. त्यामुळे गुंडगिरी करणाऱ्या या महिल्यांच्या टोळीवर कारवाई होईल.
- वंदना गायकवाड, महिला प्रवासी संघटना


हेही वाचा -

तरूणीला चालत्या लोकलमधून फेकलं, नालासोपाऱ्यातील घटना

लोकलच्या हँडिकॅप डब्यात चढला अन् फसला... तुम्ही करू नका असं धाडस


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा