तरूणीला चालत्या लोकलमधून फेकलं, नालासोपाऱ्यातील घटना


तरूणीला चालत्या लोकलमधून फेकलं, नालासोपाऱ्यातील घटना
SHARES

विरारमध्ये एका १९ वर्षांच्या तरुणीला चालत्या लोकलमधून खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोमल चव्हाण असं या तरूणीचं नाव असून या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. कोमलला त्वरीत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या प्रकारानं पुन्हा एकदा महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नालासोपारा येथे राहणाऱ्या काेमलने कामावरून घरी परतण्यासाठी विरार रेल्वे स्थानकातून लोकल पकडली. ती महिलांच्या डब्यात बसली होती. लोकल सुरु होताच एक अनोळखी व्यक्ती त्या डब्यात चढली आणि कोमलकडं पैसे मागू लागली. कोमलनं या व्यक्तीला पैसे देण्यास नकार दिल्यावर तिनं विरार आणि नालासोपारादरम्यान कोमलला चालत्या गाडीतून खाली फेकून दिलं.

कोमलच्या खांद्याला जबर दुखापत झाली असून तिच्या खांद्यावर विरारमधील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याशिवाय तिच्या गुढघ्यालाही गंभीर मार बसला आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या वेळेस कोमल महिलांच्या डब्यात चढली, तेव्हा डब्यात ती एकटीच होती, डब्यात एकही पोलीस कर्मचारी नव्हता.

कोमलला चालत्या गाडीतून फेकून देणारी व्यक्ती अजूनही फरार असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं शोध घेत आहेत.



हे देखील वाचा -

'त्या' प्रवाशाच्या मृत्यूस जबाबदार कोण?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा