चालत्या लोकलमध्ये तरूणीला बलात्काराची धमकी देणारा गजाआड


चालत्या लोकलमध्ये तरूणीला बलात्काराची धमकी देणारा गजाआड
SHARES

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या तरुणीसमोर अश्लील चाळे करून तिला बलात्काराची धमकी देणाऱ्या माथेफिरुला अखेर बोरीवली जीआरपीने गजाआड केलं आहे. राजू पप्पू (१९) असं या माथेफिरुचं नाव असून त्याला ताब्यात घेण्यासाठी जीआरपीला तब्बल एक महिना लागला.

या प्रकरणी १० जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला पकडण्यासाठी जीआरपीने ५ टीम बनवल्या होत्या. त्यानुसार पप्पू चर्चगेट येथील दर्ग्यात किंवा बोरिवलीतील एका मंदिरात येत असल्याची माहिती जीआरपीला मिळाली होती. पण या कालावधीत तो कधीच तिथं भटकला नाही. त्यामुळं पोलिसही हैराण झाले होते.


संशयित तरुणाचा कोणताही ठावठिकाणा आमच्याकडे नव्हता, त्याचा शोध घेण्यासाठी जीआरपी टीम गुजरातच्या वापी, वलसाड तसेच सूरतला जाऊन आल्या होत्या. शेवटी रविवारी बोरीवली रेल्वे स्थानक परिसरात गस्त करत असताना अचानक पप्पू पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याची चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला आहे.
- पुरूषोत्तम कराड, पोलीस उप आयुक्त, पश्चिम रेल्वे




नेमकं काय केलं या माथेफिरुनं?

२२ वर्षीय तक्रारदार तरूणीने २४ मे च्या दुपारी बोरिवलीहून चर्चगेटकरीता गाडी पकडली. गाडी सुरु होताच शेजारील अपंगांच्या डब्यात उभा असलेला एक तरुण आपल्याकडे बघून अश्लील चाळे करत असल्याचं तिला दिसलं. हे बघताच ती थोडी धास्तावली. पण तिने धीर न सोडता आरपीएफ कंट्रोलला फोन केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान गाडी कांदिवलीला येताच हा माथेफिरू डब्यातून उतरून थेट तरुणीच्या डब्यात घुसला आणि तरूणीला बलात्कार करण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला.


फेसबुक पोस्टनंतर आली जाग...

आर्श्चयाची बाब म्हणजे आरपीएफला ही घटना फोनवरून सांगितल्यावर आरपीएफचा जवान चक्क तिच्यावर हसला आणि कारवाई न करताच फोन ठेवून दिला. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित आरपीएफ जवानांना निलंबित करण्यात आलं.
घटनेच्या १५ दिवसानंतर तरूणीनं घडलेला प्रकार फेसबुकवर टाकल्यावर हे प्रकरण व्हायरल होताच, जीआरपीला याप्रकरणी गुन्हा दाखल करणं भाग पडलं.



हे देखील वाचा -

पोलिसांनी आवळल्या जादूगार टोळीच्या मुसक्या



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा