अरुण गवळीची पुन्हा तुरुंगातून सुटका

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीला पुन्हा एकदा तुरुंगातून फरलोवर २८ दिवसांच्या रजेवर सोडण्यात आलं आहे.

अरुण गवळीची पुन्हा तुरुंगातून सुटका
SHARES

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीला पुन्हा एकदा तुरुंगातून फरलोवर २८ दिवसांच्या रजेवर सोडण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीचा हा फरलो मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी अरुण गवळीच्या मुलीचे लग्न झाले. त्यावेळी त्याला आधीच दिलेल्या ४५ दिवसांच्या पॅरोलमध्ये वाढ केली होती.

गवळीला सध्या मिळालेल्या २८ दिवसांच्या पॅरोलसाठी ३० नोव्हेंबर २०१९ मध्ये तुरुंग प्रशासनाकडे अर्ज केला होता. यावरील सुनावणी मंगळवारी ७ जुलैला झाली.या आधी गवळीला ८ वेळा पॅरोलवर तुरुंगातून सोडण्यात आले आहे. याआधी अरुण गवळी पत्नीच्या आजारपणासाठी ४५ दिवसांसाठी पॅरोलवर नागपूर तुरुंगातून सोडलं होतं. २७ एप्रिलला त्याने कारागृहात हजर होणं अपेक्षित होतं.

पण लॉकडाऊन वाढल्यामुळे अरुण गवळीने अर्ज करत पॅरोल वाढवण्याची मागणी केली होती. यावेळी न्यायालयाने १० मे पर्यंत अरुण पॅरोलमध्ये वाढ केली होती. यानंतरही अरुण गवळीला वाढ देत २४ मे पर्यंत पॅरोल देण्यात आला होता. पॅरोलवर बाहेर असताना अरुण गवळीची योगिताचा विवाहसोहळा पार पडला.

मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीत मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला अगदी मोजकेच लोक उपस्थित होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा