एजाज लकडावालाच्या पोलिस कोठडीत वाढ

लकडावालाने केलेल्या आणि त्याचा सहभाग असलेल्या गुन्ह्यांची व्याप्ती पाहता. गुन्ह्यातील सहभाग निश्चित करण्यासाठी मिळणारा अवधी हा कमी आहे. त्यामुळेच खंडणी विरोधीपथकाने लकडावालाच्या पोलिस कोठडीत वाढ मिळावी अशी मागणी केली

SHARE

अंडरवर्ल्ड डॉन (DON) दाऊद इब्राहिमचा हस्तक कुख्यात गँगस्टर (Gangster)एजाज लकडावाला  याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. लकडावालाला २७ जानेवारी पर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी दिले. लकडावालावर ८० हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी मुंबईत २५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 

हेही वाचाः- 'त्या' लकी कॅाईनमुळे वाचला जीव , दिवार सिनेमासारखी घडली घटना - एजाज लकडावाला

कुख्यात गुंड एजाज लकडावालाची अटक हे मुंबई पोलिसां (Mumbai police)चं मोठं यश मानलं जात आहे. त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्याने केलेल्या आणि त्याचा सहभाग असलेल्या गुन्ह्यांची व्याप्ती पाहता. गुन्ह्यातील सहभाग निश्चित करण्यासाठी मिळणारा अवधी हा कमी आहे. त्यामुळेच मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधीपथकाने लकडावालाच्या पोलिस कोठडीत वाढ मिळावी अशी मागणी न्यायालयात केली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिस कोठडीत वाढ केली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन लकडावालाला अटक केल्याची माहिती दिली होती. 

हेही वाचाः- एजाज लकडावाला 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

 मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत एजाज लकडावाला होता. २७ प्रकरणात एजाज लकडावाला गुन्हेगार आहे. यामध्ये हत्या, खंडणी सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. बँकॉकमध्ये २००३ मध्ये एका हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला अशी अफवा पसरली होती. मात्र या हल्ल्यात तो वाचला होता. यानंतर तो बँकॉकहून कॅनडाला गेला होता. अनेक वर्षापासून तो कॅनडात राहत होता. छोटा राजनला साथ दिल्याने दाऊद इब्राहिम लकडावाला याच्यावर नाराज झाला होता. 

हेही वाचाः- कुख्यात गुंड इजाज लकडावालाच्या मुलीला अटक

याआधी मुंबई विमानतळावर एजाज लकडावालाच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. सोनिया मनीष अडवाणी या नावाने बनावट पासपोर्टच्या आधारे ती देशाबाहेर पळून जात होती. तिची चौकशी केली असता एजाज लकडावालासंबंधी माहिती उघड झाली होती. बिहार पोलिसांच्या टीमची मदत घेऊन पटना विमानतळावर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. ८ जानेवारीला रात्री ९ वाजता एजाज लकडावालाला अटक करण्यात आली आणि त्याला लगेच मुंबईत आणण्यात आल्याचं सहआयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी यांनी सांगितलं.

हेही वाचाः- भीक मागताना गुंड इजाज लकडावालाच्या भावाला अटक; जामिनावर सुटून होता फरार

संबंधित विषय
ताज्या बातम्या