गॅसच्या अनुदानाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


गॅसच्या अनुदानाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

गॅस एजन्सी तसेच त्यासाठी मिळणारे लाखोंचे सरकारी अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी त्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार केले होते. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. रवीकुमार रविदास(३६) व डॉली शर्मा(३५) यांना नुकतीच याप्रकरणी बिहार येथून अटक करण्यात आली. याशिवाय आणखी दोघांना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः- मुंबईतील चार रुग्णालयांत लसीकरणाला सुरुवात होणार

गोरेगाव येथील रहिवासी असून ते एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. समाज माध्यमांवर त्यांनी एक जाहिरात पाहिली होती. त्यात गॅस एजन्सी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याशिवाय त्यासाठी मिळणारी ३० लाखांची सबसिडीही मिळवून देणार असल्याचे नमुद करण्यात आले होते. त्यांनी संबंधीत लिंकवर क्लीक केले व तेथील फॉर्म पत्नीच्या नावे भरला. दोन दिवसानंतर त्यांना डीके शर्मा नावाच्या व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्याने आपण एलपीजी वितरक चयन येथून बोलत असल्याचे सांगितले. त्याने तक्रारदाराला एजन्सी देण्यासाठी निवडले असल्याचे सांगितले. एजन्सी व ३० लाख रुपयांचे सरकारी अनुदान देण्यासाठी आरोपी विविध फी भरायच्या असल्याचे सांगितले. त्यात ना हरकत प्रमाणपत्र, प्रोसेसिंग फी यासाठी तीन लाख ६६ हजार रुपये तक्रारदाराने भरले. त्यानंतर तक्रारदाराला कन्फर्मेशन लेटर मिळाले. त्याची पडताळणी करण्यासाठी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या पत्त्यावर त्याने जाऊन पाहणी केली असता तो बोगस असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचाः- मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात

पुढे संकेतस्थळही बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पटना येथून रवीकुमार रविदास(३६) व डॉली शर्मा(३५)यांना अटक केली. याप्रकरणी आणखी दोघांना पश्चिम बंगाल येथूनही अटक करण्यात आली आहे. आरोपींनी मुख्य आरोपींनी संकेतस्थळ तयार करण्यात मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी अशा प्रकारे देशातील अनेकांना फसवल्याचे निष्पन्न झाले आहे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा