लग्नाच्या दिवशीच होणारी बायको पळाली!

  Kalachauki
  लग्नाच्या दिवशीच होणारी बायको पळाली!
  मुंबई  -  

  लग्न मनाविरोधात होत असेल, तर कुणीच सुखी राहत नाही. आयुष्याचा रहाटगाडा एका चाकावर कधीच चालत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे जोडीदार निवडीचा निर्णय कितीही कटू असला, तरी धाडस दाखवून तो घेणे आवश्यक असते अन्यथा त्याचे परिणाम दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांना भोगावे लागतात.

  नेमका असाच एक प्रकार काळाचौकी परिसरात घडला आहे. येथील एका वधूने हळद लागल्यानंतर घरातून पळ काढल्याची घटना घडली आहे.


  अशी झाली जुळवाजुळव

  परळ येथे राहणाऱ्या श्रीधर जोशी (नाव बदलले आहे) यांचे सायन येथील 22 वर्षीय मोनाली नांदगावकर (नाव बदलले आहे) हिच्यासोबत लग्न ठरले होते. सोनालीचे आई-वडील लहानपणीच वारल्याने ती आजीकडे रहात होती.

  सोनालीला लग्नासाठी पसंत केल्यानंतर 27 मे रोजी श्रीधर आणि सोनलचा साखरपुडा झाला. 3 जुलै ही लग्नाची तारीख ठरवण्यात आली. त्यानंतर दोन्ही घरांमध्ये लग्नाची धावपळ सुरू झाली. लग्नपत्रिका, कपडे, दागिन्यांची खरेदी, नातेवाईकांना आमंत्रण यामध्ये दोन्हीकडील कुटुंब व्यस्त झाले.


  लग्नाच्या दिवशी पळ

  रविवारी म्हणजेच 2 जुलैला हळद झाली. वधुला हळद लावण्यासाठी श्रीधरचे भाऊ, बहिणी, आणि पुतणी सोनालीच्या घरी जाऊन आले. हळदीचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर सर्वजण लग्नाची आतुरतेने वाट पाहू लागले. मात्र लग्नाच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता एक फोन आला आणि होत्याचे नव्हते झाले.

  साेनालीच्या मामाने श्रीधरच्या घरी फोन करुन सोनाली सकाळपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. हे ऐकताच श्रीधरसह संपूर्ण कुटुबांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी काही वेळ वाट बघितल्यानंतर शेवटी काळाचौकी पोलिस ठाणे गाठत सोनालीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

  या प्रकरणी कलम 420 तसेच 417 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप उगले यांनी दिली.  हे देखील वाचा -

  पैशांसाठी त्यानं बायकोलाच बनवलं बहीण!

  डॉक्टरने घेतला मैत्रिणीच्या गालाचा चावा  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.