प्रताप सरनाईकांना MMRDA कडून दिलासा, भ्रष्टाचार झालाच नसल्याचा दिला पोलिसांना अहवाल


प्रताप सरनाईकांना MMRDA कडून दिलासा, भ्रष्टाचार झालाच नसल्याचा दिला पोलिसांना अहवाल
SHARES

‘ईडी’च्या रडारवर असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना MMRDA ने मोठा दिलासा दिला आहे. टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा अहवाल MMRDA ने मुंबई पोलिसांच्या शाखेला दिला आहे.  तसेच टॉप्स कंपनीवर लावण्यात आलेले आरोप तथ्यहीन असल्याचे एमएमआरडीएने आपल्या अहवालात नमूद केले आहे. टॉप्स कंपनीकडून एमएमआरडीएला ५०० सुरक्षारक्षक कंत्राटानुसार दिले होते. त्यापैकी ७० टक्के सुरक्षारक्षक कामावर येत होते. मात्र, तरीही सर्व सुरक्षारक्षकांचे वेतन काढले जात आहे, असा आरोप करत रमेश अय्यर यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती.

हेही वाचाः- ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना भारतात बंदी

टॉप्स ग्रुपच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणात तीन वेळा समन्स बजावून देखील चौकशीला हजर न राहिलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गुरूवारी सक्तवसूली संचलनालय कार्यालयात चौकशीला हजर राहिले. तब्बल सात तासाच्या चौकशींतर सरनाईकांना ईडीने जाऊ दिले. MMRDS कंत्राटातील गैरव्यवहारातील काही रक्कम सरनाईक यांना मिळाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. दरम्यान एमएमआरडीएच्या निविदा प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, या निविदा प्रक्रियेतील ६ कंपन्यांना मान्यता देण्यात आली होती. त्यावेळी टॉप्स कंपनीलादेखील या निविदा प्रक्रियेत मान्यता देण्यात आली होती. निविदा प्रक्रियेत नमदू केल्याप्रमाणे टॉप्स कंपनीने सुरक्षा रक्षक पुरवलेत आणि त्यांना निविदा प्रक्रियेप्रमाणेच निधीदेखील देण्यात आला आहे. तसेच गैरहजर सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दिवसाप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे, असा अहवाल एमएमआरडीएने दिला आहे.

हेही वाचाः- राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, ठाकरे सरकारचा निर्णय

एमएमआरडीएच्या अहवालानंतर प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या २ इमारतींमध्ये ४ मजल्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. तर, सोमय्या यांनी ८ वर्षे जुने प्रकरण बाहेर काढून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार, असे प्रताप सरनाईक म्हणाले. दरम्यान सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाबाबत  MMRDA ने अहवालाद्वारे कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे कळवले आहे. मात्र तरीही आम्ही या प्रकरणाची सोखल चौकशी करत असल्याची माहिती पोलिस दलातील सूत्रांनी दिली आहे.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा