वैयक्तिक वैमनस्यातून माहीममध्ये गोळीबार, दोघांना अटक

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत मुंबईत माहीममध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वैयक्तिक वैमनस्यातून माहीममध्ये गोळीबार, दोघांना अटक
SHARES

कोरोनामुळे  देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत मुंबईत माहीममध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना  ताब्यात घेतलं आहे.

लॉकडाऊन असतानाही माहीममध्ये गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात हा गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

याआधी लॉकडाऊन असताना हत्येची घटनाही घडली आहे. शिवडी परिसरात पार्किंगच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्याची आली होती. शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणात या तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यातही मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. यामुळे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी गरजेची असतानाच असे प्रकार समोर धक्कादायक आहेत. 


हेही वाचा -

अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ला, काँग्रेसवर केले गंभीर आरोप

दिलासादायक बातमी, ९ कंटेनमेंट झोनमध्ये एकही नवीन रुग्ण नाही




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा