दारूची बाटली लपवली म्हणून केली प्रेयसीच्या आईची हत्या


दारूची बाटली लपवली म्हणून केली प्रेयसीच्या आईची हत्या
SHARES

मुंबईच्या आरे काॅलनी परिसरात प्रियकराने त्याच्या होणाऱ्या सासूची निर्घुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूची बाटली लपवल्याचा राग अनावर झाल्याने त्याने होणाऱ्या सासूची हत्या केल्याचे पोलिस तापासात समोर आले आहे. या प्रकरणी आरे काँलनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- फ्लाइंग राणी एक्स्प्रेसमध्ये २ प्रवाशांकडून टीसीला बेदम मारहाण

आरे काँलनीच्या प्रजापूरपाडा माँर्डन बेकरीजवळ आरे काॅलनी येथे मृत साकरू उर्फ शहनाज गंभीर शेख (४०) या रहात होत्या, त्यांना एक मुलगी असून तिचे आरोपी भैया सूरज (२५)  याच्याशी प्रेमसंबध होते. भैया सूरज हा मजुरीचे काम करायचा. मुंबईत राहण्यासाठी  दुसरी व्यवस्था नसल्यामुळे तो प्रेयसी आणि मृत साकरू उर्फ शहनाज यांच्यासोबतच रहात होता. भैया सूरज दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. मागील अनेक दिवसांपासून शहनाजही त्याला मुलीशी लग्न कर म्हणून पाठी लागली होती. मात्र आज उद्या आज उद्या करत सूरज हा टाळाटाळ करत होता.

हेही वाचाः- साकीनाकातून तब्बल ३४५ किलोचा गांजा जप्त

सूरज हा दारूच्या दिवसेंदिवस आहारी जात असल्यामुळे तिने सूरजची बाटली लपवली. यावरून सूरज आणि शहनवाजचे जोरदार भांडण झाले. त्यावेळी राग अनावर झालेल्या सूरजने घराच्या अंगनातच शहनवाजला मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करताना तिक्ष्ण हत्याराने सूरजने शहनवाजला मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सूरजला ताब्यात घेत, जखमी शहनवाजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरे काँलनी परिसरात ३०२ भा.द.वी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी सूरजला अटक केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा