शक्ती मिल गँगरेप प्रकरणात १४ जानेवारीला निर्णय

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान या तिघांनी भादंवि कलम ३७६ (ई)च्या वैधतेला आव्हान दिलं होतं. दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर केंद्र सरकारने २०१२ मध्ये हे कलम लागू केलं होतं. या कलमांतर्गत एखादा आरोपी याआधीही अशाप्रकारच्या गुन्ह्यात दोषी आढळला असेल, तर त्याला जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे.

शक्ती मिल गँगरेप प्रकरणात १४ जानेवारीला निर्णय
SHARES

मुंबई उच्च न्यायालय २०१३ मध्ये शक्ती मिल परिसरात एका फोटो जर्नलिस्टवर झालेल्या बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेल्या ३ आरोपींच्या याचिकेवर १४ जानेवारीला सुनावणी करणार आहे.

मृत्यूदंड आणि जन्मठेप

२०१४ मध्ये सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील ५ आरोपींपैकी तिघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. या तिघांनीही मुंबई उच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. दोषींमध्ये विजय जाधव, काशिम बंगाली आणि सलिम अन्सारी यांचा समावेश आहे. तर चौथा आरोपी सिराज खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून पाचवा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

कलमाला आव्हान

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान या तिघांनी भादंवि कलम ३७६ (ई)च्या वैधतेला आव्हान दिलं होतं. दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर केंद्र सरकारने २०१२ मध्ये हे कलम लागू केलं होतं. या कलमांतर्गत एखादा आरोपी याआधीही अशाप्रकारच्या गुन्ह्यात दोषी आढळला असेल, तर त्याला जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे.

आरोपींनी याआधीही याच जागेवर एका १८ वर्षांच्या टेलिफोन आॅपरेटरवर बलात्कार केलेला असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आरोपींनी २२ आॅगस्ट २०१३ रोजी शक्ती मिलमध्ये फोटो जर्नलिस्टवर बलात्कार केला.

हेही वाचा-

तेलतुंबडे, नवलखा यांना अटकेपासून दिलासा

विजय माल्याला हायकोर्टाकडून दिलासा नाही; ईडीविरोधात याचिका फेटाळली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा