सफाई करणाऱ्या महिलेनेच चोरली लाखोंची रक्कम

मालाड पश्चिम परिसरातील काचपाडा लिंक रोड येथे एका प्रिटिंग प्रेसेमध्ये तीन लाखांची रक्कम चोरणाऱ्या महिलेची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. प्रिंटिंग प्रेसच्या मालकाने कामगारांचे पैसे देण्यासाठी साडे तीन लाखांची रोकड आपल्या केबिनमधील कपाटात ठेवली होती. दुसऱ्या दिवशीच म्हणजे 12 एप्रिलला सकाळी 8 वाजता रोजच्याप्रमाणे ऑफिसची साफसफाई करण्यासाठी आलेल्या बाईची सफाई करताना पैशांच्या बंडलवर नजर पडली आणि तिने रक्कम लंपास केली. 

प्रिटिंग मालक प्रकाश दोषी जेव्हा 10 वाजता ऑफिसला पोहोचले तेव्हा त्यांना कपाटातील रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कर्मचाऱ्यांना याबाबत विचारलं असता कुणीच काही रीतसर उत्तर दिलं नाही. अखेर सीसीटीव्ही तपासले असता सफाई करणाऱ्या महिलेने ही रक्कम चोरल्याचे उघडकीस आले. दरम्यान, ही महिला गरीब असून, तिची छोटी छोटी मुलं असल्याकारणाने मालकाने तिला माफ केले आहे.

Loading Comments