घाटकोपरमध्ये आॅनर किलींग, प्रेमविवाह केल्याने वडिलांनी केली मुलीची हत्या

मनिषाचे त्याच परिसरातील तरुणाशी प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र घरातून त्यांच्या या प्रेमसंबधांना विरोध होता. त्यामुळे मनिषाने फेब्रुवारी महिन्यातच तरुणासोबत पळून जाऊन लग्न केले.

घाटकोपरमध्ये आॅनर किलींग, प्रेमविवाह केल्याने वडिलांनी केली मुलीची हत्या
SHARES

घाटकोपरच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील मीनाक्षी चौरसिया या २० वर्षीय गर्भवतीची तिच्याच वडिलांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना पोलिस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी रामकुमार चौरसिया याला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीने केलेल्या प्रेमविवाहामुळे नातेवाईंकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यामुळेच मुलीची हत्या केल्याची कबुली रामकुमारने दिली आहे.


मदतीच्या बहाण्याने बोलावले

घाटकोपर पश्‍चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गावर रामकुमार याची पानाची टपरी आहे. मयत मनिषाचे त्याच परिसरातील तरुणाशी प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र घरातून त्यांच्या या प्रेमसंबधांना विरोध होता. त्यामुळे मनिषाने फेब्रुवारी महिन्यातच तरुणासोबत पळून जाऊन लग्न केले. एप्रिल महिन्यात मनिषा गर्भवती राहिल्याचे रामकुमारला कळाले. आधीच मुलीने पळून जाऊन जातीबाहेर लग्न केल्यामुळे नातेवाईकांकडून रामकुमारला टोमणे मारले जात असल्यामुळे रागातून रामकुमारने मनिषाचा काटा काढायचे ठरवले. त्यानुसार त्याने मनिषाला राग विसरून पैशांची मदत करत असल्याचे सांगून घरी बोलवले. रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नारायण नगरजवळच लाल बाहादूर शास्त्री मार्गावर मीनाक्षी वडिलांची वाट पाहत होती. यावेळी रामकुमार तेथे आला. सकाळच्यावेळी या ठिकाणी कुणी नसल्याने त्याने सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने तिच्यावर वार करून तिथून पळ काढला.


दहशत पसरली

भररस्त्यात सकाळी हा मृतदेह आढळून आल्याने घाटकोपरमध्ये एकच खळबळ उडाली. लाल बहादूर शास्त्री मार्ग हा मुंबईतील महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता आहे. असे असताना भररस्त्यात हत्या झाल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. पोलिसाकडे या हत्येबाबत कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी घरांतल्यांजवळ विचारपूस करण्यास सुरूवात केली. त्यावेळी रामकुमारच्या चौकशीत तफावत आढळून आली. त्यावेळी पोलिसांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर रामकुमारने हत्येची कबूली दिल्याची माहिती पोलिस उपायुक्त अखिलेशकुमार सिंग यांनी दिली.



हेही वाचा -

लोकलमध्ये प्रवाशाला गुंगीचे औषध देऊन लुटले

नायर रुग्णालयातील ३ निवासी डाॅक्टरांना मारहाण




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा