चिंताजनक! मुंबईच्या कोविड सेंटरमध्ये विवाहितेचा विनयभंग

तो चहा पिण्याच्या नावाखाली वारंवार महिलेच्या क्वारनटाइन सेंटरबाहेरून चकरा मारत होता.

चिंताजनक!  मुंबईच्या कोविड सेंटरमध्ये विवाहितेचा विनयभंग
SHARES

कोविड सेंटर हे महिलांसाठी असुरक्षित असल्याचे पून्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कारण मुंबईच्या कुरार परिसरात कोविड सेंटरमध्ये एका सुरक्षा रक्षकानेच विवाहितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपीला १ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

हेही वाचाः- पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल, भाजपावर गंभीर आरोप

कुरार येथे कोविड महिला रुग्णांसाठी पठाणवाडी जंक्शन परिसरातील नामकिंत रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयात ३५ वर्षीय कोविडची लक्षणे आढळलेल्या महिलेला क्वारनटाइन करण्यात आले होते.  याच रुग्णालयात आरोपी सूरेश कोचेवाड (२१) हा सिक्युरिटी गाडम म्हणून काम करत होता. रुग्णालयात महिला दाखल झाल्यापासून  सूरेशची त्या महिलेवर वाईट नजर होती. गुरूवारी त्याची ड्युटी ही रुग्णालयाच्या पाठच्या गेटवर होती. काही कामानिमित्त सूरेश हा रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर बसणाऱ्या सुपरवायझरकडे गेला होता. त्यावेळी त्याने क्वारनटाइन सेंटरमध्ये त्या महिलेला पाहिले.

हेही वाचाः- यंदा फटाकेमुक्त दिवाळी‌? राज्य मंत्रिमंडळात मागणी करणार...

त्यानंतर तो चहा पिण्याच्या नावाखाली वारंवार महिलेच्या क्वारनटाइन सेंटरबाहेरून चकरा मारत होता. त्यानंतर रात्री २ वा. रुग्णालयात नागरिकांचा वावर कमी झाल्यानंतर पून्हा चहाच्या नावाखाली महिलेच्या क्वारनटाइन कक्षाबाहेरून जाताना. कुणी नसल्याचे पाहून तो महिलेच्या खोलीत शिरला. त्यावेळी झोपलेल्या महिलेशी त्याने अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने आरडा ओरडा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा