गोरेगावात शाळेच्या बाजूलाच हुक्का पार्लर


गोरेगावात शाळेच्या बाजूलाच हुक्का पार्लर
SHARES

गोरेगाव - न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना देखील पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हुक्का पार्लरचे अवैध बांधकाम 30 फूट उंचीपर्यंत वाढवल्याचा प्रकार गोरेगावच्या सुंदरनगर परिसरात घडला आहे.

या परिसरातील मैफिल हुक्का पार्लरच्या अनधिकृत बांधकामाविषयी 2014 मध्ये तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी पार्लरच्या मालकाने न्यायालयात धाव घेऊन या अनधिकृत बांधकामावर स्थगिती मिळवली. मात्र 2016 पर्यंत सुनावणी चालू असताना देखील बांधकाम ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत न राहता त्या ठिकाणी सहा ते सात महिन्यांपूर्वी पुन्हा बांधकाम करण्यात आले .

विशेष म्हणजे या हुक्कापार्लरच्या आजूबाजूच्या परिसरात शाळा आणि महाविद्यालये आहेत. त्यामुळे मुले या पार्लरकडे आकर्षित हाऊ शकतात अशी भीती इथल्या नागरिकांनी व्यक्त केली. महत्त्वाचे म्हणजे 14 फुटांवरील अनधिकृत बांधकामे तोडून टाकण्याचे आदेश मनपा आयुक्त अजॉय मेहता यांनी दिले असताना देखील पी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांनी या आदेशांना केराची टोपली दाखवल्याचा आरोप होत आहे.

त्यामुळे या अनधिकृत हुक्का पार्लरवर कारवाई होणार का असा सवाल स्थानिक नागरिक सचिन चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, याबाबत पालिका सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांनी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करू असे सांगितले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा