पत्नीची हत्या करणाऱ्या नवऱ्याला अटक

Versova
पत्नीची हत्या करणाऱ्या नवऱ्याला अटक
पत्नीची हत्या करणाऱ्या नवऱ्याला अटक
See all
मुंबई  -  

व्यसनाधीन पतीने क्षुल्लक कारणावरून पत्नीची हत्या केल्याची घटना मुंबईच्या वर्सोवा परिसरात सोमवारी सकाळी घडली. नेहा भालचींद असे या माहिलेचे नाव असून या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आरोपी सचिन भालचंद याला पुण्यात अटक केली.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या बऱ्याच महिन्यांपासून नेहा आणि सचिन यांच्यात वाद सुरू होते. सचिन आणि नेहा हे दोघेही अंधेरीतील ज्ञानकेंद्र शाळेच्या गाडीवर कामाला होते, सचिन गाडीवर चालक होता तर, नेहा ही अटेंडेंट म्हणून काम करत असे. लग्नानंतर दोघे सागर कुटीर येथे राहत असत. सचिनला दारुचे व्यसन जडले होते. त्यावरून दोघांमध्ये नेहमी भांडण देखील होत असे. चार महिन्यांपूर्वी सततच्या भांडणाना कंटाळून नेहा घर सोडून माहेरी राहायला गेली. त्यानंतर ती परळ येथून नोकरीसाठी अंधेरीला येत असे.

सोमवारी नेहमीसारखी नेहा ड्युटीवर हजर झाली. मॉडल टाऊन येथे तिच्या शाळेची बस पार्क केलेली असताना सचिन तिथे आला. त्याने नेहाला खाली बोलावून घेतले तिथे पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली. तेव्हा सचिनने रागाच्याभरात नेहावर चाकूने तीन वार केले. नेहा तिथेच कोसळली. त्यानंतर सचिनने तिथून पळ काढला. पण काही वेळानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे तिथल्या स्थानिकांनी पाहिले आणि नेहाला कूपर रुग्णालयात नेले. पण तिथल्या डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. हत्येच्या अवघ्या काही तासांतच वर्सोवा पोलिसांनी सचिन याला पुण्यावरून ताब्यात घेतले.हेही वाचा -

मानसिक रुग्णाची हत्या, एकाच कुटुंबातील 6 जणांवर गुन्हाडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.