नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ, सहकार्य न केल्यास पोलिस करणार अटक

न्यायालयाने नरेंद्र मेहता यांची मागणी फेटाळून लावत, पोलिसांना सहकार्य करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा दम भरला

नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ, सहकार्य न केल्यास पोलिस करणार अटक
SHARES
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतावर भाजपच्याच नगरसेविकेने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी गुन्हा नोंद केल्यानंतर मेहता यांनी न्यायालयात गुन्हा रद्द करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने नरेंद्र मेहता यांची मागणी फेटाळून लावत, पोलिसांना सहकार्य करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा दम भरला.

भाजपचे नेते आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपच्या एका नगरसेविकेने नरेंद्र मेहतांविरोधात अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तक्रारीत नगरसेविकेने भाजप नगरसेविकेने केलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, 'नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या कुटुंबियाला धोका आहे. नरेंद्र मेहतांनी १९९९ पासून ते २०२० पर्यंत माझे लैंगिक शोषण केले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी त्यांनी माझा वापर करून घेतला होता. माझ्याप्रमाणेच मेहता यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे.' दरम्यान, भाजपच्या नगरसेविकेने याप्रकरणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी दखल न घेतल्यामुळे त्यांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी या नगरसेविकेने कोकण महानिरिक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मेहतांवर गुन्हा नोंदवण्यात आला.

मात्र हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून मेहतांनी हायकोर्टात धाव घेतलेली होती. या प्रकरणावर बुधवारी हायकोर्टात सुनावणी पार पडली असून 20 मार्च ला पुढची सुनावणी ठेवण्यात आलीय..तोपर्यंत आरोपी नरेंद्र मेहता यांनी पोलीस तपासात सहकार्य करावे लागेल अन्यथा त्यांना अटक करण्यात येऊ शकते. दरम्यान पीडित महिलेच्या जीवाला धोका असून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे शिवाय या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्राँचच्या डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केला जावा अशी मागणी पीडितेचे वकील रिझवान मर्चंट यांनी कोर्टात केलीय. मात्र मेहता यांच्या कुटुंबियाकडून हे सर्व आरोप बिनबुडाचे असून राजकीय स्टंट असल्याचा आरोप करण्यात आला आहे.



हेही वाचा -

बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी भाजप नेते नरेंद्र मेहता हायकोर्टात

महिला अत्याचारांच्या खटल्यासाठी ४८ विशेष न्यायालय स्थापन करणार - अनिल देशमुख




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा