विना मास्क रेल्वेतून प्रवास केल्यास भरावा लागेल ‘इतका’ दंड

विना मास्क प्रवास करणाऱ्यांविरोधात दंड वसूल करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारने रेल्वे पोलिसांना देण्यात आले आहे.

विना मास्क रेल्वेतून प्रवास केल्यास भरावा लागेल ‘इतका’ दंड
SHARES

शहरात कोरोनाचं संक्रमाणावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असताना. राज्य सरकारने सर्व सामान्यांसाठी रेल्वे सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दाखवला असला. तरी  रेल्वेतून प्रवास करताना मास्क असणे आवश्यक आहे. विना मास्क प्रवास करणाऱ्यांविरोधात दंड वसूल करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारने रेल्वे पोलिसांना Railway police देण्यात आले आहे. आटोक्यात आलेल्या कोरोना व्हायरस संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी राज्य सरकारने हे निर्देश दिले आहेत.  

हेही वाचाः-  पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ७७ नवीन कोरोना रुग्ण

राज्य सरकारचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी एका पत्रातून विनामास्क रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पत्र रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना लिहिलेले आहे. या पत्रात कारवाईतील  दंडात्मक रक्कम बृहन्मुंबई महानगरपालिकेने (MCGM) ९ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने घेतली जाईल. दरम्यान, MCGM सार्वजनिक ठिकाणी मुखवटे न सापडलेल्या लोकांना २०० रुपये दंड ठोठावत आहे. महापालिकेच्या परीपत्रकानुसार, मुंबई लोकलमधून प्रवास करताना किंवा स्टेशन (Railway stations) परिसरात मास्क न लावता फिरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, प्रवाशाला दंड आकारण्याचा रेल्वे पोलिसांना अधिकार आहे. कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्याासठी आपण सर्व नियम, संकेत पाळले पाहिजेत असे आदेश परिपत्रकाद्वारे दिलेले आहेत.

हेही वाचाः-राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा घोटाळा, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १५ जून पासून रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. आता त्यात वाढ करुन उपनगरिय रेल्वेच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत.सध्या स्थितीत उपनगरी मार्गावर रेल्वेच्या १४१० विशेष रेल्वे सेवा सुरु आहेत. तसेच १० महिला स्पेषल गाड्या धावत आहेत. तसेच, सर्वसामान्य नागरिकांना गर्दी नसलेल्या कालावधीत प्रवास करण्यासही मुभा आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा