रिया चक्रवर्ती चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात हजर

सुशांत आणि रियामध्ये मैत्रीचे संबध होते. त्यामुळे सुशांत का नैराक्षेत होता. अशा कोणत्या अडचणी होत्या, त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. याबाबत रियाला कडे माहिती असण्याची शक्यता आहे.

रिया चक्रवर्ती चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात हजर
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणाच्या चौकशीसाठी मॅडेल रिया चक्रवर्ती गुरूवारी सकाळी वांद्रे पोलिस ठाण्यात हजर झाली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर तिच्याकडे विचारपूस केली होती. मात्र ती बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी पून्हा तिला चौकशीसाठी बोलवले होते. त्यानुसार रिया ही हजर झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या पूर्वी ही पोलिसांनी या प्रकरणात ६ जणांची चौकशी केली होती.


मागील अनेक दिवसांपासून मानसिक तणावखाली असलेल्या सुशांत सिंग राजपूतने रविवारी सकाळी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने उचललेल्या या टोकाच्या पाऊलाने अनेकांना धक्का बसला. नुसत्या बाँलीवूडमधील नाही तर राजकीय नेते, खेळाडू सर्वांनीच सुशांतला सोशल मिडियावरून श्रद्धांजली वाहिली. मात्र त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप ही पुढे आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत ६ जणांची चौकशी केली होती.त्याच प्रामुख्याने रिया चक्रवर्ती, सुशांतचे दोन मॅनेजर, सुशांतचा जवळचा मित्र अभिनेता महेश सेट्टी, एक नोकर आणि चावीवाल यांचा समावेश होता. आत्महत्येनंतर काही तासातच पोलिसांनी सुशांतने उचललेल्या आत्महत्येच्या पाऊलाबाबत चौकशी केली होती. मात्र त्यावेळी ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. दरम्यान गुरूवारी सकाळी रिया स्वतः चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर झाली होती. मात्र तिच्या चौकशीत तिने पोलिसांना काय माहिती दिली हे अद्याप समोर आलेले नाही.

हेही वाचा- यंदा मुंबईकरांच्या पाणीपट्टीत होणार वाढ?

मागील अनेक दिवसांपासून सुशांत आणि रियामध्ये मैत्रीचे संबध होते. त्यामुळे सुशांत का नैराक्षेत होता. अशा कोणत्या अडचणी होत्या, त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. याबाबत रियाकडे माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पोलिसांनी रियाला चौकशीसाठी बोलावले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिया सोबतच सुशांत ज्या डाँक्टरांकडे नैराक्षेत उपचार घेत होता. त्यांची देखील पोलिस चौकशी करणार आहेत. तसेच सुशांतला दैनदिन डायरी लिहायची सवय असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातून काही डायऱ्या ही हस्तगत केल्याचे कळते. ज्यातून सुशांतच्या आत्महत्ये मागील कारण समजण्यास पोलिसांना मदत होऊ शकते. तसेच पोलिसांनी त्याचा जवळचा मित्र मुकेश छाब्रा याची ही बुधवारी पोलिसांनी चौकशी केली आहे. मुकेशनेच सुशांतला त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा रोल दिला होता. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. या आत्महत्येला व्यावसायिक स्पर्धा, गटबाजी आणि वशिलेबाजी कारणीभूत असल्याचा आरोप होत असून पोलिस त्या अनुशंगाने तपास करत आहेत.  

हेही वाचाः- मुंबईत पावसाची विजांच्या कडकडाटासह हजेरी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा