मालेगाव बाॅम्बस्फोट: सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहाण्याचे कोर्टाचे आदेश

भाजपाची भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञा यांच्यासोबत मालेगाव बाॅम्बस्फोटातील सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)च्या विशेष न्यायालयाने दिले आहेत.

मालेगाव बाॅम्बस्फोट: सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहाण्याचे कोर्टाचे आदेश
SHARES

भाजपाची भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञा यांच्यासोबत मालेगाव बाॅम्बस्फोटातील सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)च्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. आरोपी न्यायालयात हजर राहात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत न्यायालयाने  हे आदेश दिले आहेत.

सध्या एनआयए न्यायालयात मालेगाव बाॅम्बस्फोटाची सुनावणी सुरू आहे. असं असूनही या प्रकरणातील आरोपी सुनावणीला हजर राहात नसल्याने न्यायालयाने सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मे रोजी होणार आहे. 

मालेगावमध्ये सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या दुचाकी बाॅम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विशेष एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासहित लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय इ. आरोपींना जामीन दिला होता.



हेही वाचा-

मालेगाव बाॅम्बस्फोटातील आरोपीला पाहिजे सुरक्षा, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

साध्वीच्या उमेदवारीचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, एनआयए न्यायालयाने फेटाळली याचिका



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा