'हिरा गोल्ड' कंपनीकडून गुंतवणूकदारांची ५०० कोटींना फसवणूक

हिरा गोल्ड कंपनीचे संचालक नौहिरा शेख यांच्याविरोधात अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबईत या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या १ हजारच्यावर आहे. यापूर्वी नौहिरा यांच्यावर हैदराबाद येथे फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य मुस्लिम समुदयाचे लोक आहेत.

'हिरा गोल्ड' कंपनीकडून गुंतवणूकदारांची ५०० कोटींना फसवणूक
SHARES

देशातील विविध राज्यांतील गुंतवणुकदारांची ५०० कोटी रुपयांना फसवणूक करणाऱ्या हिरा गोल्ड कंपनीचे संचालक नौहिरा शेख यांच्याविरोधात अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबईत या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या १ हजारच्यावर आहे. यापूर्वी नौहिरा यांच्यावर हैदराबाद येथे फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य मुस्लिम समुदयाचे लोक आहेत.


गुंतवणूकदारांना मोबदलाच दिला नाही

मुस्लिम धर्मात बँकेत पैसे ठेवणे, त्यांचे व्याज घेणे अमान्य आहे. याच संधीचा फायदा घेत नौहिरा याने २००८ मध्ये हिरा ग्रुप कंपनीची स्थापना केली. त्यानंतर नौहिराने कंपनीतील नफ्याचा वाटा देण्याच्या नावाखाली लाखो मुस्लिम नागरिकांना पैसे गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं.

या आवाहनानंतर देशातील विविध राज्यांसह आखाती देशातील मुस्लिम नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले. त्यानुसार पहिल्या वर्षी सर्वांना व्यवस्थित कंपनीकडून मोबदला मिळाला. मात्र नोटबंदीनंतर कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाली. त्यामुळे कंपनीने गुंतवणूकदारांना आर्थिक मोबदला दिला नाही.


देशभरात गुन्हे नोंदवण्यास सुरुवात

मागील सहा महिन्यांपासून अनेकांना पैसे येणे बंद झाल्यानंतर अनेक गुंतवणुकदारांनी पुढे येऊन आवाज उठवला. याप्रकरणी पहिला गुन्हा हा हैदराबादमध्ये कंपनीविरोधात नोंदवला. या गुंतवणूकदारांमध्ये मुंबईतील एक हजाहून अधिक नागरिकांनी पैसे गुंतवले होते.

त्यातील जे. जे. मार्ग पोलिस ठाणे येथे एका बूट विक्रेत्यानं मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले होते. मोबदला न मिळाल्यामुळे झालेल्या नुकसानामुळे त्याने जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात कंपनीचा मालक नौहिरा याच्याविरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर या कंपनीविरोधात देशभरात आता गुन्हे नोंदवण्यास सुरुवात झाली आहे.


हेही वाचा - 

हाॅटेलांमध्येच चोरी करणाऱ्या वेटरचा देवनार पोलिसांकडून शोध सुरू

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा