एकाच माणसाकडे सापडले 126 आयफोन!

 Mumbai Airport
एकाच माणसाकडे सापडले 126 आयफोन!

विलेपार्ले - मुंबई अांतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीची नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. त्यात आता भर पडली आहे ती आयफोनच्या तस्करीची. गुरुवारी रात्री मुंबई विमानतळावरुन तब्बल 126 आयफोन पकडण्यात आले आहेत. त्यातील 121 जुने तर 5 नवीन आयफोन आहेत.

या आयफोनची किंमत 31 लाख 50 हजार रुपये असून या प्रकरणी कस्टम विभागाने आसिफ इकबाल मुनाफ नावाच्या प्रवाशाला अटक केली आहे. आसिफ जोहान्सबर्गमधून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या सामनाच्या तपासात 126 आयफोन कस्टम विभागाच्या हाती लागले. विमानतळावरील स्कॅनर्सपासून वाचण्यासाठी हे आयफोन अतिशय पद्धतशीरपणे लपवण्यात आले होते.

तर, दुसऱ्या एका कारवाईत कस्टम विभागाने रामलाल मांशरामनी याच्याकडून सहा सोन्याचे बार जप्त केले आहेत.

551 ग्रॅम वजनाच्या या सोन्याच्या बारची किंमत साडे सोळा लाखांच्या घरात आहे. कस्टमची नजर चुकवण्यासाठी ही सोन्याची बिस्कीटं पॅन्टच्या चोरकप्प्यात लापवण्यात आली होती.

Loading Comments