जे.एन.युमधील मुथ्रुक्रिशनच्या आत्महत्येची चौकशीची मागणी

 Fort
जे.एन.युमधील मुथ्रुक्रिशनच्या आत्महत्येची चौकशीची मागणी
जे.एन.युमधील मुथ्रुक्रिशनच्या आत्महत्येची चौकशीची मागणी
See all
Fort, Mumbai  -  

सीएसटी - जे.एन.यु मधील विद्यार्थी मुथ्रुक्रिशनच्या आत्महत्येने विदयापीठांमधील जातीवाद पुन्हा एकदा समोर आलाय. याच निषेधार्थ विद्यार्थी भारती संघटनेच्या 40 विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले. मुथ्रुक्रिशने जे.एन.यु मधील जातीयवादाला कंटाळून 13 मार्चला आत्महत्या केली. पण, ही आत्महत्या नसून शिक्षण संस्थेने, सरकारने केलेला हा खून आहे असा आरोप विद्यार्थी भारती संघटनेच्या अध्यक्षा विजेता भोनकर यांनी केला. विद्यापिठाच्या प्रवेश प्रक्रियेत होणारी जातीयवादी विषमता बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा खुन झाला. त्याचा खुनानतंर कोणतीच चौकशी प्रशासनाला करावीशी वाटली नाही. त्यामुळे हे प्रशासन किती जातीयवादी आहे, हे सिद्ध होत आहे. तर, जे. एन यु प्रशासनावर खुनाचा खटला दाखल करावा, अशी मागणीही विद्यार्थी भारती कार्याध्यक्ष स्मिता साळुंखे यांनी या वेळी केली आहे.

Loading Comments