टिक-टॉक स्टारला चोरीच्या गुन्ह्यात अटक

मुंबईत टिक-टॉक या सोशल मीडियावरील अॅपवर प्रसिद्ध असलेल्या एका तरुणाला जुहू पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. अभिमन्यू गुप्ता असं या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहेत.

टिक-टॉक स्टारला चोरीच्या गुन्ह्यात अटक
SHARES
मुंबईत टिक-टॉक या सोशल मीडियावरील अॅपवर प्रसिद्ध असलेल्या एका तरुणाला जुहू पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. अभिमन्यू गुप्ता असं या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहेत.


वृद्ध दाम्पत्यांच्या घरी चोरी

जुहू परिसरात एका उच्चभ्रूवस्तीत राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरी जानेवारी महिन्यात अनोळखी व्यक्तीकडून चोरी करण्यात आली होती. त्यावेळी चोरानं घरातून तब्बल ४.७५ लाखाचे मौल्यवान दागिने चोरले होते. या प्रकरणी वृद्ध दाम्पत्याने जुहू पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, पोलिसांनी तपासाला सुरूवात करत, इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, अस्पष्ट फुटेजमुळं आरोपींची ओळख पटत नव्हती. अखेर रस्त्यावरील एका फुटेजमध्ये अभिमन्यूचा चेहरा स्पष्ट दिल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अभिमन्यूला पोलिसांनी कुर्ला परिसरातून अटक केली.


९.८ लाख फॉलोअर्स

अभिमन्यूकडून चोरी केलेले मौल्यवान दागिने हस्तगत करणं अद्याप बाकी आहे. अभिमन्यू हा सराईत आरोपी असून त्याच्यावर ५ ते ६ गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र, असं असलं तरी टिक टॉक या सोशल मीडियावर अभिमन्यू खूपच फेमस आहे. टिक टॉकवर अभिमन्यूला तब्बल ९.८ लाख फॉलोअर्स आहेत.


हेही वाचा -

सर्व खासदारांसह उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जाणार​​​

अंधेरीत २३ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा