महिलांना अश्लील फोटो पाठवून त्रास देणाऱ्यास कर्नाटकातून अटक

सणासुदीच्या काळात महिलांच्या कपड्यांच्या दुकानात काम करत होता आणि दुकानात आलेल्या महिलांकडून त्यांचे फोन नंबर घ्यायचा. नंतर या नंबरवर व्हॉट्सअपवरून पॉर्नोग्राफिक वेबसाइटवरचे नग्न आणि अश्लील व्हिडिओ त्यांना पाठवून त्यांचा छळ करायचा.

महिलांना अश्लील फोटो पाठवून त्रास देणाऱ्यास कर्नाटकातून अटक
SHARES

महिलांच्या मोबाईलवर नग्न फोटो आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या कर्नाटकमधील एका सेल्समनला मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. इक्बाल शेख (२९) असं या सेल्समनचं नाव असून मुंबई पोलिसांच्या युनिट ९ ने त्याला तेलंगणातून ताब्यात घेतलं, त्याने अशा प्रकारे अनेक महिलांना फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याचा पोलिसांना संशय असून असा प्रकार कुणासोबत घडला असल्यास  महिलांनी थेट पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे.

हेही वाचाः-दिशा सालियन आत्महत्या प्रकरण : खटला सीबीआयकडे सोपवण्यास न्यायालयाचा नकार

अनेकदा आपल्या फोनवर एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाइलवरून अश्लील मेसेज येण्यास सुरूवात होते. मात्र काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र असे येणारे मेसेज कधी तरी तुम्हाला अडचणीत आणू शकतात. मुंबईत खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेला असेच अपरिचित नंबरवरून अश्लील फोटो आणि Porn Video व्हॉट्सअपवरून पाठवण्यात आले. सुरवातीला तिने देखील त्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून तो नंबर बंद केला. मात्र कालांतराने दुसऱ्याच नंबरहून तिला मेसेज येऊ लागले. हा प्रकार थांबता थांबत नसल्यामुळे अखेर तिने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी त्या विकृत माणसांचा शोध घेत त्याला कर्नाटकातून ताब्यात घेतलं. हा मनुष्य महिलांच्या कपड्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून कामाला होता, असं उघड झालं आहे आणि त्याने आतापर्यंत अशा अनेक महिलांना असे अश्लील फोटो पाठवले.

हेही वाचाः- 26/11 Attack : मुंबई हल्ल्यांनंतर समुपदेशकांचे महत्त्व कळाले

इक्बाल सणासुदीच्या काळात महिलांच्या कपड्यांच्या दुकानात काम करत होता आणि दुकानात आलेल्या महिलांकडून त्यांचे फोन नंबर घ्यायचा. नंतर या नंबरवर व्हॉट्सअपवरून पॉर्नोग्राफिक वेबसाइटवरचे नग्न आणि अश्लील व्हिडिओ त्यांना पाठवून त्यांचा छळ करायचा. तो सतत ठिकाणं आणि फोन नंबर बदलत होता. त्याने पवईतील एका डाँक्टर महिलेलाही अशा प्रकारे मेसेज केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  बहुतेक महिला या प्रकरणी दुर्लक्ष करतात किंवा पोलिसांपर्यंत पोहोचल नाहीत. त्यामुळे त्याचा शोध घेणं अवघड झालं, असं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा