मुंबईतील मासे व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक; कर्नाटकच्या व्यावसायिकाला अटक

रेहमानने चाळके यांच्याकडून ५५ लाख ९५ हजार ३१२ रुपयांच्या मच्छीची विक्री केली. यातील २७ लाख रुपये रेहमानने चाळके यांना दिले. मात्र उर्वरित पैसे देण्यास तो टाळाटाळ करत होता.

मुंबईतील मासे व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक; कर्नाटकच्या व्यावसायिकाला अटक
SHARES

मुंबईतील व्यापाऱ्याकडून माशांची खरेदी करून लाखो रूपयांची फसवणूक करणाऱ्या कर्नाटकच्या एका बड्या व्यावसायिकाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. टम्टानापराम अब्दुल रेहमान) (५२) असं या अारोपी व्यापाऱ्याचं नाव असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

२८ लाखांची फसवणूक

 फोर्ट परिसरात अमीना मंजिल येथे माशांची विक्री करणारे रघुनाथ चाळके यांनी रेहमान याने फसवणूक केल्याची तक्रार केली होती. चाळके यांच्या कंपनीकडून रत्नागिरी, रायगड, गोवा, पोटबंदर, पालघर, वेरावळ, द्वारका, ओखा या ठिकाणी माशांची विक्री केली जाते. चाळके यांनी मच्छी विक्रीचं काम राहुल इंटरनॅशनल कंपनीला दिलं आहे. सप्टेंबर महिन्यात चाळके यांचे रत्नागिरीतील पुरवठादार अल्लादीन सोलकर मुंबईला आले होते. त्यांच्यासोबत आरोपी रेहमान देखील होता. सोलकरने आरोपींची आणि चाळके यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर रेहमानने चाळके यांच्याकडून ५५ लाख ९५ हजार ३१२ रुपयांच्या मच्छीची विक्री केली. यातील २७ लाख रुपये रेहमानने चाळके यांना दिले. मात्र उर्वरित पैसे देण्यास तो टाळाटाळ करत होता.

रेहमान फरार व्हायचा

चाळके यांनी पैशाची मागणी केली असता रेहमानने त्यांना उडवा उडवीची उत्तरं देत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे चाळके यांनी कुलाबा पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिस कारवाईसाठी कर्नाटकला गेल्यानंतर रेहमान फरार व्हायचा. रेहमान काॅफर्ड मार्केट येथे मच्छीची खरेदी करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.



हेही वाचा -

गेट वे वरील प्रवासी बोटींवर चोरीचे डिझेल : तिघांना अटक

नाना पाटेकर -तनुश्री दत्ता वाद : राखी सावंतला धमक्यांचे फोन




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा