नाशिक पोलिसांना गुंगारा देणारा महाठग जेरबंद

 Kherwadi
नाशिक पोलिसांना गुंगारा देणारा महाठग जेरबंद

खेरवाडी - नाशिक पोलिसांना 6 महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या महाठगाला खेरवाडी पोलिसांनी बुधवारी वांद्रे पूर्व येथून अटक केली आहे. विनोद पाटील (28) असं या महाठगाचं नाव असून, तो 6 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. या ठगाने हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनी स्थापन केली होती. त्याद्वारे आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून त्यांनी ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 

या प्रकरणी नाशिक पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल होता. आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून पाटील आणि इतर संचालकांनी गुंतवणूकदारांना रक्कम जमा करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला त्यांनी काही ठेवीदारांना चांगला परतावा दिला. पण नंतर त्याने परतावा देण्यास टाळाटाळ केली. पाटील आणि इतर आरोपींनी 3 हजार 664 गुंतवणूकदारांना एकूण 30.93 कोटी रुपयांचा गंडा घातला होता. दरम्यान बुधवारी पाटील मुंबईत येणार असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली. त्यानंतर नाशिक पोलिसांच्या सांगण्यावरून खेरवाडी पोलिसांनी सापळा रचून पाटील याला अटक केली.

Loading Comments