विद्यार्थिनीने उधळून लावला अपहरणाचा प्रयत्न


विद्यार्थिनीने उधळून लावला अपहरणाचा प्रयत्न
SHARES

मालाडमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्ये महापालिका शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीचे तीन अनोळखी व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या तीन आरोपींनी शाळेत घुसून पीडित मुलीचे अपहरण केले आणि रिक्षातून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या मुलीने आरोपीच्या हाताचा चावा घेवून स्वत: ची सुटका केली.

पीडित मुलीच्या आईने घाटकोपर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तात्काळ तक्रार नोंदवली आहे. भटवाडी परिसरातील रामजी नगरमध्ये पीडित मुलगी आईसोबत राहत असून महापालिकेच्या हिंदी माध्यमाच्या सातवी इयत्तेत शिकत आहे.


अशी घडली घटना

पीडित मुलगी शाळेतील तळमजल्यावरील स्वच्छतागृहात जात असताना तोंडाला रुमाल बांधलेले दोन अनोळखी व्यक्ती अचानक तिच्या समोर आले. या दोघांनी तिचे तोंड दाबून जबरदस्तीने तिला रिक्षात बसविले. ही घटना सोमवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सुमारास घडली आहे. त्यानंतर ही रिक्षा साकीनाक्याच्या दिशेने जात असताना एका आरोपीने फोन करुन 'आपण राकेश बोलत, आहोत. मुलीला घेऊन येत आहे' असल्याचे फोनवरुन सांगितले. रिक्षा असल्फाजवळ येताच मुलीने अगदी धाडसपणे एका आरोपीच्या हाताला चावा घेतला आणि पळ काढला. मुलीने आरडाओरड करुन लोकांना गोळा केले. पण, रिक्षाचालकासह दोन आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाले.


मुलीच्या धाडसाचे कौतुक

पीडित मुलीने धाडसपणे संकटावर मात केल्यामुळे तिचे कौतुक केले जात आहे. कुठल्याही परिस्थतीत मुलींनी घाबरुन न जाता. धाडसाने आलेल्या समस्येला तोंड दिले पाहिजे, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मत भटवाडी परिसरातील रहिवासी कोमल माने यांनी व्यक्त केले.


महापालिका शाळातील सुरक्षा वाऱ्यावर

पीडित मुलगी महापालिका शाळेत शिकत असूनही शाळेत तोंडाला रुमाल बांधलेले दोन व्यक्ती घुसलेच कसे? हा प्रश्न उभा राहिला आहे. या महापालिका शाळेला दोन दरवाजे असून केवळ एकच सुरक्षारक्षक आहे. तोही शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असतो. मागच्या बाजूच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नसून हे आरोपी मागच्या दरवाजातून आत अाल्याचे कळते आहे. या घटनेनंतर महापालिका शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिंनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

घाटकोपर पोलीस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींवर पोस्को कायद्याअतंर्गत लैंगिक अत्याचार आणि अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या विभागातील सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलीस आरोपींचा तपास करत आहेत.



हे देखील वाचा - 

खंडणीसाठी सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणारे नराधम गजाआज



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा