किनारा हॉटेल दुर्घटनाग्रस्तांना हवी 40 लाखांची भरपाई


किनारा हॉटेल दुर्घटनाग्रस्तांना हवी 40 लाखांची भरपाई
SHARES

कुर्ला - किनारा हॉटेल गॅस सिलेंडर स्फोटातील मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना नुकतीच 1 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. पण ही मदत पुरेशी नसल्याचं म्हणत वॉचडॉग फाऊंडेशनने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती फाऊंडेशनचे ट्रस्टी अॅड. गोडफ्रे पिमेंटा यांनी दिली आहे.

आई-वडिलांचा म्हातारपणाचा आधार होती अशी मुलं पालकांनी गमावली. त्यातही पालिका अधिकारी हॉटेल मालक यांच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली. अशावेळी सरकारकडून या पालकांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात अाली नाही. त्यामुळे वॉचडॉग फाऊंडेशनने लोकआयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यानुसार लोकआयुक्तांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाखांची मदत जाहीर केली आहे. फाऊंडेशनने मात्र 40 लाखांच्या मदतीची मागणी केली आहे. असं असताना लोकआयुक्तांनी हे प्रकरण निकाली काढले आहे. त्यामुळे आता फाऊंडेशनने न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करत याचिका दाखल करण्यात येणार आहे असं पिमेंटा यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा