बिबट्याची 'हॅप्पी'वर झडप

आरे कॉलनीच्या जंगलामध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पहायला मिळाली. आरे कॉलनीमध्ये काही दिवसांपूर्वी एका लहान मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची चर्चा होती. त्या पाठोपाठ आता सोमवारी रात्री एका बिबट्याने एका पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 


हेही वाचा - 

आरे कॉलनीत बिबट्याचा धुमाकूळ

आरे कॉलनीतून बिबट्या जेरबंद


मिळालेल्या माहितीनुसार, आरेमध्ये मुलींचे एक वसतिगृह आहे. 9 जूनला सुमारे पावणे पाच वाजता हा बिबट्या हॉस्टेलच्या गेटजवळ गेला. मात्र गेट बंद असल्यामुळे तो आतमध्ये जाऊ शकला नाही. त्याचवेळी हॉस्टेलमधील हॅप्पी नावाच्या कुत्र्यावर बिबट्याने झडप घातली. तेवढ्यात समोरुन दुसरे कुत्रे आल्यामुळे बिबट्या त्या कुत्र्याच्या मागे गेला आणि हॅप्पीची सुटका झाली. हॅप्पी पळत असल्याचे पाहून बिबट्याने पुन्हा आपला मोर्चा हॅप्पीच्या दिशेने वळवला. यानंतर हॅप्पीचं काय झालं, हे मात्र कळू शकलेलं नाही.

Loading Comments